पाणी कपातीमुळे चंद्रपुरात कृत्रिम पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 10:30 PM2018-09-16T22:30:25+5:302018-09-16T22:30:56+5:30

पावसाळ्याचे दिवस सुरु असताना ही चंद्रपूरकरांवर पाणी कपातीचे संकट लादल्या जात आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. चंद्रपूर शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणीकर पूर्ण का घेण्यात येतो, असा प्रश्न उपस्थित करीत महानगर पालिकेने यंदाचा पाणी कर हा निम्मा घ्यावा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Artificial water scarcity in Chandrapur due to water cut | पाणी कपातीमुळे चंद्रपुरात कृत्रिम पाणी टंचाई

पाणी कपातीमुळे चंद्रपुरात कृत्रिम पाणी टंचाई

Next
ठळक मुद्देआयुक्तांना निवेदन : पाणी कर निम्मा करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : पावसाळ्याचे दिवस सुरु असताना ही चंद्रपूरकरांवर पाणी कपातीचे संकट लादल्या जात आहे. परिणामी पावसाळ्यात चंद्रपूरकरांवर पाण्यासाठी भटकंती करायची वेळ आली आहे. चंद्रपूर शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा होत असताना पाणीकर पूर्ण का घेण्यात येतो, असा प्रश्न उपस्थित करीत महानगर पालिकेने यंदाचा पाणी कर हा निम्मा घ्यावा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच चंद्रपुरात सुरु असलेली पाणी कपात पावसाळ्याच्या अखेरही सरूच आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाण्याची भटकंती थांबण्याची आशा असलेल्या चंद्रपूरकरांचा भ्रमनिरास झाला आहे. अशी स्थिती असतानाही मनपा पाणी टंचाई असल्याचे मान्य करायला तयार नाही. मात्र उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच शहरात पाण्यासाठी पानीपत सुरू आहे ही वस्तुस्थिती आहे. याचा नाहक त्रास चंद्रपूरकरांना सोसावा लागत आहे.
त्यामुळे महानगर पालिका प्रशासनाप्रती नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. त्यामुळे मनपाने यावर्षी पाणी कर हा अर्धा घ्यावा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त संजय काकडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
अनेक प्रभागात चार दिवसाआड पाणीपुरवठा
शहरातील काही प्रभागात चक्क चार दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. सद्या गणपती उत्सव सुरू असल्याने नागरिकांना मोठी अडचण निर्माण होत आहे. मात्र याकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. केवळ पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या उज्ज्वल कन्स्ट्रक्शनला लाभ पोहोचविण्याचे कार्य होत असल्याचा आरोपही त्यांनी निवेदनातून केला आहे. तसेच शहरात पाणी कपात सुरू असल्याने मनपाने पाण्याच्या करात कपात करीत निम्मा कर घ्यावा, अशी मागणी किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त संजय काकडे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

Web Title: Artificial water scarcity in Chandrapur due to water cut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.