शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपुरात कृत्रिम टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 22:41 IST

चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे.

ठळक मुद्देआमसभेतही निर्णय नाही : धरण हाऊसफुल्ल; तरीही नागरिकांना पाणी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चंद्रपूर औद्योगिक शहर आहे. शासनाला या भूमीतून कोट्यवधीची रॉयल्टी मिळते. असे असले तरी प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीन धोरणामुळे या भूमीतील लेकरांना मुलभूत गरजांसाठी संघर्ष करावा लागत आहे. मागील अनेक वर्षांपासून पाण्यासाठी चंद्रपुरात बोंब सुरू असतानाही आजपर्यंत पाण्याची वितरण व्यवस्था चांगली होऊ शकली नाही. भर पावसाळ्यात इरई धरण तुडुंब भरले असतानाही चंद्रपुरात अनियमित पाणी पुरवठा होत आहे. यामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.विशेष म्हणजे, चंद्रपूरकरांना या संघर्षातून कोणताही नगरसेवक वा मनपा प्रशासन मुक्त करू शकले नाही. चंद्रपूरची लोकसंख्या चार लाखांच्या घरात गेली आहे. पूर्वी चंद्रपूरला पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी जीवन प्राधीकरणाकडे होती. त्यावेळी एखादवेळी पाण्याची बोंब व्हायची. त्यानंतर पाणी पुरवठा करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे देण्यात आली. बऱ्याच कालावधीपर्यंत नगरपालिकेने स्वत: ही जबाबदारी सांभाळली. त्यावेळी शहरात काही ठिकाणी पाईप लाईन बदलविण्यात आली होती. यालाही आता ५०-६० वर्षांचा कालावधी लोटला आहे. त्यानंतर पुढे कर्मचाºयांच्या अभावामुळे व वाढत्या कामाच्या ताणामुळे नगरपालिका प्रशासनाला शहराला पाणी पुरवठा करणे जिकरीचे होऊ लागले. त्यामुळे पाणी पुरवठ्याचे खासगीकरण करण्यात आले.मागील वर्षी अत्यल्प पाऊस झाल्यामुळे इरई धरणात पाण्याची साठवणूक होऊ शकली नाही. हिवाळ्यातच धरणाने तळ गाठला. त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रारंभीच शहरात एक दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्यात आला. यावर्षी बºयापैकी पाऊस झाला. इरई धरणातही मुबलक जलसाठा आहे. मात्र अद्यापही शहरात एक दिवसाआडच पाणी दिले जात आहे.यातून नागरिकांच्या गरजाही पूर्ण होत नाही. नागरिकांना पाण्यासाठी मोठे हाल सहन करावे लागत आहे. विशेष म्हणजे, नळ आल्यानंतर प्रारंभी काही वेळ दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे हे पाणी पिण्यासाठी वापरता येत नाही.चंद्रपुरात दररोज केव्हा पाणी पुरवठा केला जाईल, याबाबत विचारणा केली असता लवकरच केला जाईल, असे मनपाकडून सांगितले जाते. मात्र अद्यापही मनपा यासाठी मुहुर्त शोधत असल्याचे दिसते.कंत्राटी कंपनीचे फावलेपाणी पुरवठ्याचे खासगीकरण झाल्यानंतरच पाणी पुरवठ्याचे धिंडवडे उडाले. वितरण व्यवस्थाच अस्तित्वात आहे की नाही, असेच वाटायले लागले. सध्या शहराचा पाणी पुरवठा करण्याचे कंत्राट उज्ज्वल कन्स्ट्रक्शन कंपनीकडे आहे. मात्र या कंपनीचे वितरण व्यवस्थेकडे अजिबात लक्ष नसल्याने शहरभर पाण्यासाठी बोंबा मारल्या जात आहे. नवीन कनेक्शन देऊन ही कंत्राटी कंपनी मोकळी होते. पुढे त्या कनेक्शनधारकाला व्यवस्थित पाणी मिळत आहे की नाही, हे पाहण्याचे सौजन्यही दाखविले जात आहे. एखाद्याने पाणी मिळत नाही, अशी तक्रार केली की त्याला पुन्हा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आता एक दिवसाआड पाणी देणे सुरू असल्याने या कंपनीचे चांगले फावत आहे.