शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राजुऱ्यातील पीडितांच्या न्यायासाठी आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 00:13 IST

राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूलनिवासी गोंडीयन आदिवासी समाज व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.

ठळक मुद्देगोंडीयन समाज रस्त्यावर : उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : राजुरा येथील एका वसतिगृहातील विद्यार्थिंनीवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा देऊन पीडितांना न्याय देण्याच्या मागणीसाठी मूलनिवासी गोंडीयन आदिवासी समाज व आदिवासी सामाजिक संघटनांच्या वतीने गुरूवारी उपविभागीय कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात हजारो समाजबांधव सहभागी झाले होते.नागभीड तालुक्यातील पारडी ठाणा येथील अल्पवयीन मुलीवर असाच अत्याचार झाला होता. या प्रकरणातील पीडित मुलीला अद्याप न्याय मिळाला नाही. सरकारने केवळ आश्वासने देऊन बोळवण केली, असा आरोप मूलनिवासी आदिवासी गोंडीयन समाज व आदिवासी संघटनांनी यावेळी केला.शहरातील गोंड मोहल्ला नेताजी वॉर्डातून मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चेकऱ्यांनी संस्था चालकाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील येथील मुख्य मार्गाने हा मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडकला. त्यांनतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. समाजातील ज्येष्ठ मंडळींनी राजुऱ्यातील घटनेचा कठोर शब्दात निषेध केला. हे प्रकरण आता न्यायप्रविष्ठ झाले आहे. परंतु, शासनाने अशी प्रकरणे घडू नये, याकरिता कडक उपाययोजना करण्याची मागणी मान्यवरांनी केली. शिष्ठमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.राजुरा येथील शाळा व संस्था कायमची बंद करावी, संस्था चालकांना त्वरीत अटक करावी, दोषी कर्मचाºयांना निलंबीत करून निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सर्व सवलती कायमच्या बंद कराव्यात, संस्था चालकाकडून पीडित मुलींना उपचाराकरिता १० लाख द्यावे, या प्रकरणात हयगय करणारे डॉक्टर व ठाणेदारावर अ‍ॅट्रासिटी कायद्यातंर्गत गून्हा नोंदवून तत्काळ निलंबित करावे, आदिवासी विकास योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, निधी अखर्चित ठेवणाऱ्यांवर कारवाई करावी, आदी १४ मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. तहसीलदार संजय नागटिळक व उपविभागीय पोलीस अधिकारी इंगवले यांनी हे निवेदन स्वीकारले. यावेळी मनोज मडावी, नानाजी उईके , माधुरी वरखेडे, सरस्वती उईके, इंदरशहा मडावी, दागो वरखेडे, प्रमोद कोयचाडे, दिलीप मडावी, मंगला मडावी, पुष्पा नैताम आदी उपस्थित होते. दुपारी १२.०० वाजता सुर्य आग ओकत असतानाही हजारो आदिवासी बांधव, विद्यार्थिनी व महिला सहभागी झाले होते.

टॅग्स :Morchaमोर्चा