बल्लारपूर : महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय, बल्लारपूर येथे एन. सी. सी. व सैन्य विज्ञान विभागातर्फे तसेच एन. सी. सी. कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय भास्कर व गौस बेग यांच्या मार्गदर्शनाखाली ७३ वा थल सेना दिवस साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. नंदकिशोर कुमार (प्रा. एनडीए, खडकवासला) यांनी खास पुण्याहून ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून ऑनलाईन एन. सी. सी. कॅडेट्सना संबोधित केले. यावेळी कुमार यांनी एनसीसीच्या कॅडेट्सना मार्गदर्शन करताना भारतीय सेना व तिची उत्कृष्ट परंपरा, त्याचबरोबर भारतीय सेनेचे रणकौशल्य आणि पाकिस्तानबरोबर झालेल्या युद्धावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाच्या प्राचार्य ज्योती भुते यांनी भूषविले. यावेळी डॉ. पंकज कावरे, प्रा. स्वप्नील बोबडे, प्रा. कल्याणी पटवर्धन, प्रा. विनय कवाडे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. योगेश टेकाडे यांनी केले.