शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या मुली शाळेत सुरक्षित आहेत का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2022 05:00 IST

शिक्षण विभागाने खासगी व्यवस्थापनातील शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी दिले होते. मात्र,  अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुण्यातील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले असून सरकारी आणि खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश जारी केला आहे.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पुण्यातील शाळेत विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर मुलींच्या सुरक्षिततेच्या मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. शाळांमध्येसीसीटीव्हीमुळे मुलींची सुरक्षितता ठेवण्यास मदत होते. मात्र, जिल्ह्यातील तब्बल २ हजार ५५ शाळांमध्येसीसीटीव्ही नसल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये काही खासगी तसेच जिल्हा परिषद शाळांचाही समावेश आहे. त्यामुळे भविष्यात एखादी अनुचित घटना घडल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.शिक्षण विभागाने खासगी व्यवस्थापनातील शाळांना सीसीटीव्ही लावण्याचे आदेश काही वर्षांपूर्वी दिले होते. मात्र,  अनेकांनी याकडे दुर्लक्ष केले आहे. आता पुण्यातील अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची सक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी लक्ष केंद्रीत केले असून सरकारी आणि खासगी शाळांमध्येही सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्याचा आदेश जारी केला आहे. मात्र, आता पालकांनीही सक्त होऊन व्यवस्थापन तसेच प्रशासनाला यासंदर्भात विचारणा करणे सध्या तरी गरजेचे आहे. जिल्ह्यातील काही मोजक्याच आणि शहरातील इंग्रजी शाळांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. मात्र ग्रामीण भागातील इंग्रजी खासगी शाळांध्येही सीसीटीव्ही नसल्याची स्थिती आहे.

अनेक शाळांमध्ये सीसीटीव्ही कागदावरच- जिल्ह्यातील काही शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात आले आहे. मात्र, त्यातील अनेक शाळांतील सीसीटीव्ही बंद आहे तर काही ठिकाणी केवळ कागदोपत्रीच सीसीटीव्ही असल्याचे दाखविण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

 पालक चिंतेत 

शाळांमध्ये आपले मुले सुरक्षित राहील की नाही याची आता पालकांना चिंता सतावत आहे. खासगी शाळांसह जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही लावून विद्यार्थ्यांची सुरक्षितता बाळगणे सध्यातरी गरजेचे झाले आहे. प्रशासनाने सीसीटीव्ही लावण्याची सक्ती करावी.वनश्री गेडाम, चंद्रपूर

शाळांमध्ये सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक शाळांत सीसीटीव्हीच नाही. विशेषत: जिल्हा परिषद शाळांमध्ये सीसीटीव्ही नाही. त्यामुळे  अप्रिय घटना घडण्यापूर्वी सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही लावावेत.-प्रतिभा कोडापे, चंद्रपूर 

 

टॅग्स :cctvसीसीटीव्हीSchoolशाळा