शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
3
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
4
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
5
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
6
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
7
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
8
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
9
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास
10
'बिग बॉस १९' मध्ये काही आठवड्यांसाठीच दिसणार सलमान खान? चाहत्यांमध्ये निराशा
11
तीन महत्त्वपूर्ण निर्णयांमुळे सर्वोच्च न्यायालय अडचणीत, अलाहाबाद प्रकरणी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी अखेर केला हस्तक्षेप
12
हरितालिका २०२५: हरितालिकेचे व्रत कुणी करू नये? पाहा, महती, महात्म्य, महत्त्व अन् मान्यता
13
SBI केवळ या नंबर्सवरुन करतं ग्राहकांना फोन; अन्य कोणत्याही क्रमांवरुन कॉल आल्यास व्हा सावध, काय आहे प्रकरण?
14
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
15
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
16
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
17
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
18
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
19
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
20
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा

विंजासन बुद्धलेणीत विकासात्मक कामे करण्यास पुरातत्व विभागाची आडकाठी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:42 IST

भद्रावती नगर परिषद ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहरातील ऐतिहासिक व पर्यटन असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा भद्रावती नगर परिषदेचा माणस आहे.

अभिप्राय देण्याला विलंब : नागरिकांत रोषलोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती नगर परिषद ऐतिहासिक शहर असल्यामुळे या शहरातील ऐतिहासिक व पर्यटन असलेल्या स्थळांचा विकास करण्याचा भद्रावती नगर परिषदेचा माणस आहे. भद्रावती नगर परिषदेने विंजासन बुद्ध लेणी येथील विकासात्मक कामे करण्याकरिता न.प. सर्वसाधारण सभेत ३० मे रोजी ठराव घेतला व कामे प्रस्तावित केली. प्रस्तावित कामास पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालयाच्या निर्णयान्वये ४ जानेवारी २०१७ ला १९९ लाखांची प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. मात्र या कामांत पुरातत्व विभागाकडून आडकाठी येत आहे. भद्रावती नगर परिषदेने ८ एप्रिल २०१७ ला संबंधीत काम करण्याकरिता निविदा मागविल्या. मागविण्यात आलेल्या निविदेच्या दरास न.प. सर्वसाधारण सभेत ठराव घेऊन २ मे २०१७ रोजी मान्यता प्रदान करण्यात आली आहे. विंजासन बुद्ध लेणी पुरातत्व विभागाकडे असल्याने व यापूर्वी न.प. ने घेतलेल्या कामास पुरातत्व विभागाकडून आलेली आडकाठी लक्षात घेता, नगराध्यक्षांनी २६ एप्रिल २०१७ ला अधीक्षक पुरातत्व विभाग नागपूर यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून अभिप्राय देवू असे कळविले होते. अधीक्षकानी विंजासन बुद्ध लेणीची प्रत्यक्ष पाहणी केली असता. न.प. स्थापत्य सल्लागाराकडून विंजासन बुद्ध लेणी विकास कामाचे स्ट्रक्चरल डिझाईन सादर करण्याबाबत कळविले. त्यानुसार नगराध्यक्ष व स्थापत्य सल्लागार यांनी प्रत्यक्ष उपस्थित होवून विंजासन बुद्धलेणीचे स्ट्रक्चरल डिझाईन सादर केले. नगर पालिका कार्यालयाकडून विंजासन बुद्धलेणीत विकासात्मक कामे करण्याचा अहवाल सादर करण्याबाबत पुरातत्व विभागाला कळविण्यात आले. परंतु दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटूनही पुरातत्व विभागाचा अभिप्राय अप्राप्त आहे. त्यामुळे विंजासन बुद्ध लेणी येथील मजूर कामे सुरू करण्यास विलंब होत आहे.विंजासन बुद्धलेणीमध्ये विंजासन बुद्ध लेणी येथील जोड रस्त्याचा विकास करणे, संरक्षण भिंतीचे बांधकाम करणे, लेणी परिसरामध्ये बालोद्यान व बगीचा तयार करणे व विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या कामांना अधीक्षक पुरातत्व विभाग नागपूर यांची मान्यता प्राप्त होणार नाही, तोपर्यंत कामाला सुरुवात करता येणार नाही. मात्र काम सुरू न झाल्यामुळे भद्रावती शहरातील विविध राजकीय व सामाजिक संघटनाकडून काम त्वरित सुरू करण्याबाबतचे निवेदन प्राप्त झाले आहे. मात्र पुरातत्व विभाग मान्यता देण्यास विलंब करीत असल्याने कामास विलंब होत आहे.निधी परत जाण्याची शक्यता भद्रावती शहरातील विंजासन लेणीच्या विकासाची नागरिकांना प्रतीक्षा आहे. कामाला विलंब झाल्यास नागरिकांचा रोष वाढू शकतो. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. असे घडल्यास याची सर्वस्वी जबाबदारी पुरातत्व विभागाची राहील. मंजूर कामे विहीत मुदतीत पूर्ण न झाल्यास निधी खर्च होणार नाही व निधी खर्च न झाल्याने यापुढे भद्रावती नगर पालिकेला प्रादेशिक पर्यटन निधी मधून निधी सुद्धा उपलब्ध होणार नाही. यामुळे पालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याने नगराध्यक्ष धानोरकर यांनी म्हटले आहे.