शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

३० एप्रिल: लॉकडाऊनसाठी प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर ,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजनबद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ठळक मुद्देअन्नधान्यांचा तुटवडा भासणार नाही । सीमावर्ती भागातील गावे, रस्ते कडेकोट बंदोबस्तात

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्याप्रमाणे आता १४ एप्रिल ही मर्यादा वाढवून ३० एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन सुरू राहणार आहे. यासाठी चंद्रपूर जिल्हा प्रशासन तयार असून नागरिकांची कुठलीही गैरव्यवस्था होणार नाही. याबाबतच्या उपाययोजना करण्यात येत आहे. सध्या जिल्ह्यात एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन, प्रत्येक व्यक्ती तपासली जाईल व त्याचे निर्जंतुकीकरण केले जाईल.सोबतच सीमावर्ती भागांमध्ये जिल्ह्यातील नागरिकांनी स्वत: दक्ष राहून बाहेरून येणाºया नागरिकांची माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.राज्य शासनाने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या काळात आवश्यक असणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा, अडकून पडलेल्या नागरिकांना निवारा, बेघर ,निराश्रित व व विमनस्क लोकांना रोजचे भोजन, जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था व आरोग्य यंत्रणाआणखी नियोजनबद्ध करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.पोलिसांसाठी निर्जंतुकीकरण व्हॅनजिल्ह्यातील पोलिस यंत्रणेवर या काळामध्ये प्रचंड बंदोबस्ताचा तणाव आहे. पोलीस दलाला विविध ठिकाणी कर्तव्य पूर्तीसाठी जावे लागते. त्यांच्यासाठी एका निर्जंतुकीकरण वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाकाबंदी करणारे कर्मचारी यांना कर्तव्य पूर्ण करताना कोणताही धोका संभवू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आल्याचे डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्पष्ट केले आहेविनाकारण फिरणारे २४३ वाहने जप्तजिल्ह्यामध्ये संचारबंदी लागू असताना व पूर्णत: लॉकडाऊन करण्याचे निर्देश असतानादेखील काही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरत आहेत. अशा नागरिकांच्या २४३ वाहनांना जप्त करण्यात आले आहे. १०२ लोकांवर केसेस दाखल करण्यात आल्या असून पाच लाखावर दंड करण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील काळात घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी केले आहे.६४२ नागरिक निवारागृहातजिल्ह्यामध्ये सध्या ६४२ नागरिक विविध निवारागृहामध्ये आश्रयास आहेत.. त्यांना ३० एप्रिलपर्यंत राहण्याची व जेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अन्य राज्यात अडकलेल्या नागरिकांनीदेखील या काळात आहे तिथेच राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शहरामध्ये महानगरपालिकेच्या पुढाकारातून विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने १७ हजारावर नागरिकांना भोजनदान करण्यात येत आहे. आजूबाजूच्या परिसरात कोणीही नागरिक उपाशी असल्यास या संदर्भातील हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून नागरिकांनी त्याची मदत घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.नव्या २६ लोकांपैकी २५ जणांचे नमुने निगेटिव्हजिल्हा आरोग्य यंत्रणेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार सध्या २८ नागरिकांची वैद्यकीय तपासणी झाली असून त्यातील २६ लोकांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यापैकी २५ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह असून दोन नमुने प्रतीक्षेत आहेत. आतापर्यंत विदेशातून परत आलेल्या बाहेर राज्यातून बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांची संख्या २६ हजार ६६३ आहे. त्यापैकी चार हजार ४८२ नागरिकांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर यापैकी २२ हजार १८१ लोकांनी १४ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा कालावधी पूर्ण केला आहे. ३० नागरिकांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करण्यात आले आहे.