दिवसेंदिवस कुटुंबांची संख्या वाढत आहे. कुटुंब वाढत असल्याने शौचालयांची मागणीही वाढत आहे. या वाढीव कुटुंबांचे ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी सर्वेक्षण करून तसा अहवाल पंचायत समितीला दिला. पंचायत समितीने हा अहवाल वरिष्ठ पातळीवर पाठविला. यानुसार ही मंजुरी मिळाली.
प्राप्त माहितीनुसार, सावरगाव २५, मांगली अरब २०, पळसगावखुर्द १२, वाढोणा १२, किरमिटी ११, बालापूर खुर्द १०, गिरगाव १०, म्हसली १०, मिंथूर ९, कानपा, किटाळी बोर , ओवाळा, पांजरेपार प्रत्येकी ८, मेंढा ६, वलनी ६, चिंधी चक, ढोरपा, वासाळा मेंढा प्रत्येकी ५, देवपायली, कोटगाव, कोथुळणा, विलम प्रत्येकी ४, बाळापूर बुज, चिखलगाव, चिकमारा, कोसंबी गवळी, पान्होळी प्रत्येकी २ आणि खडकी (पा), किटाळी मेंढा व नवेगाव हुं येथे प्रत्येकी १ या प्रमाणे शौचालयांना मंजुरी मिळाली आहे.