शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
2
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
3
रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण...
4
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...
5
'विदर्भ कन्या' दिव्या देशमुखची कमाल; चीनच्या नंबर वन खेळाडूला दिला शह! PM मोदींनीही दिली 'शाब्बासकी'
6
'माझे पक्षनेतृत्वाशी मतभेद, पण...', काँग्रेस नेते शशी थरुर यांचे मोठे विधान
7
'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल
8
Maharashtra: आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल
9
मोजून थकाल, पण गाडी संपणारच नाही! भारतातील 'वासुकी' ट्रेनबद्दल 'या' गोष्टी माहीत आहेत का?
10
...मग हिंदी भाषेचा जीआर निघाला कसा?; फडणवीस-राज भेटीवरून नाना पटोलेंचा गंभीर दावा
11
“होय मान्य करतो, बाळासाहेबांमुळेच मोठा झालो, तेच माझे गुरु अन् सर्वस्व”; नारायण राणेंची कबुली
12
Pataudi Trophy Row: 'पतौडी ट्रॉफी'चं नाव बदलण्याच्या वादावर अखेर सचिन तेंडुलकरने सोडलं मौन, म्हणाला- "हा निर्णय"
13
जमिनीवर असलेल्या त्या वस्तूमुळे भीषण विमान अपघातात वाचले विश्वास कुमारचे प्राण, काय होतं ते?
14
एकमेकांचे हात पकडले, धायमोकलून रडले अन् चालत्या ट्रेनसमोर उडी मारली; जोडप्याचा दुर्दैवी अंत
15
Health Tips: 'ही' जपानी टेक्निक ठेवेल तुम्हाला मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारापासून दूर!
16
जळगाव: 13 वर्षाच्या तेजसचा कुणी चिरला गळा, का केला खून? 'त्या' दोघांनी काय सांगितले?
17
असीम मुनीर यांची भेट घेऊन ट्रम्प यांनी दिले संकेत; पाकिस्तान मित्र इराणला धोका देणार?
18
विमानाची मोठी दुर्घटना टळली! इंडिगोच्या फ्लाइटला पक्षी धडकला, पायलटने घेतला मोठा निर्णय
19
१० रुपयांची फाटकी नोट बदलणार राजा रघुवंशी प्रकरणाची कहाणी? संशयाच्या फेऱ्यात अडकला 'हा' व्यक्ती!
20
“पुढील आषाढी एकादशीला अजित पवार CM म्हणून शासकीय पूजा करतील”; कुणी घातले पांडुरंगाला साकडे?

अमृतकरांच्या नियुक्तीने काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर

By admin | Updated: November 13, 2014 22:59 IST

चंद्रपर महानगर पालिकेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोपाने चर्चेत आलेल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांची नियुक्ती जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी केल्यावरून सध्या जिल्ह्यातील काँग्रेसमधील

चिंतनाची गरज : पक्षविरोधी काम करणाऱ्यांना किमान बक्षीस देऊ नयेचंद्रपूर : चंद्रपर महानगर पालिकेत पक्षविरोधी काम केल्याचा आरोपाने चर्चेत आलेल्या माजी महापौर संगीता अमृतकर यांची नियुक्ती जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षपदी केल्यावरून सध्या जिल्ह्यातील काँग्रेसमधील अंतर्गत वातावरण प्रचंड तापले आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना पक्षनेते असेच बक्षिस देत असतील, तर पदावर राहण्यात काय अर्थ, असा सवाल करीत काँग्रेसच्या प्रदेश सचिव सुनिता लोढीया यांनी गुरूवारी राजिनाम्याचा इशारा दिला. यामुळे पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड अपयश येऊनही काँग्रेस नेतेमंडळी आपली मानसिकता अद्यापही बदलायला तयार नाहीत. ही मंडळी गटातटाच्या बाहेर यायला तयार नाहीत. परिणामत: जिल्ह्यात काँगे्रसमध्ये सुरू असलेली सुंदोपसुंदी आता रोजच्याच भांडणासारखा विषय होऊ पहात आहे.गेल्या पंधरवाड्यात झालेल्या महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसमध्येच दोन गट पडले होते. ही भानगड निस्तारण्यासाठी पक्षाने निवडणूक निरीक्षक पाठवूनही परिस्थिती सुधारली नाही. काँग्रेसच्या नगरसेविका राखी कंचर्लावार ऐनवेळी भाजपात गेल्या आणि काँग्रेस नगरसेवकांच्या अन्य गटाच्या पाठिंब्याने महापौर म्हणून विजयीही झाल्या. या घडामोडीत माजी महापौर संगीता अमृतकर आणि स्थायी समिती सभापती रामू तिवारी आघाडीवर असल्याच्या तक्रारीही पक्षाकडे झाल्या होत्या. काँग्रेसला मनपात सत्ता स्थापनेची संधी होती, केवळ ती गटबाजीतून दवडली म्हणून या गटावर कारवाई होण्याची अपेक्षा काँग्रेसमधील दुसऱ्या गटाला होती. मात्र कारवाईऐवजी संगीता अमृतकर यांची जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यामुळे पक्षातील अंतर्गत वातावरण चिघळले आहे. हा प्रकार जखमेवर मीठ चोळणारा असल्याने अमृतकर यांची नियुक्ती सहन कशी करायची, असा प्रश्न आता दुसऱ्या गटातील नगरसेवक आणि पक्षातील पदाधिकारी विचारत आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)