शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

मंडल कमिशनच्या शिफारशी लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 22:52 IST

ओबीसी विद्यार्थी व विद्यार्र्थिनी तसेच ओबीसी समाज बांधवांना त्याचे अधिकार द्यावे तसेच मंडळ कमिशनच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन अ. भा. म. फुले समता परिषदच्या वतीने जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : अ.भा. म. फुले समता परिषदेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ओबीसी विद्यार्थी व विद्यार्र्थिनी तसेच ओबीसी समाज बांधवांना त्याचे अधिकार द्यावे तसेच मंडळ कमिशनच्या सर्व शिफारशी लागू कराव्या, या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन अ. भा. म. फुले समता परिषदच्या वतीने जिल्हाधिकारीमार्फत मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांना पाठविण्यात आले.भारताचे तत्कालीन प्रधानमंत्री व्ही. पी. सिंग यांनी १३ आॅगस्ट १९९० ला घटनेतील तरतूदीप्रमाणे, ओबीसीच्या विकासासाठी मंडल कमिशन केंद्रात लागू करण्याची अधिसूचना काढली. सर्वोच्च न्यायालयानेही ओबीसींना २७ टक्के आरक्षण मान्य केलेले आहे. तसेच महाराष्ट्रात १९९४ मध्ये तत्कालीन महाराष्ट्राचे मंडल आयोगाच्या शिफारशी ओबीसींच्या शिक्षण, शासकीय नोकरी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीतील लोकप्रतिनिधींसाठी लागू केल्यात. दोन मे २००३ च्या शासन निर्णयाप्रमाणे, एस. सी. व एस. टी. विद्यार्थ्यांप्रमाणेच ओबीसी विद्यार्थ्यांना मॅटीकोत्तर उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना सुरू झाली त्याचप्रमाणे खाजगी इंजिनिअर मेडीकल व व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी, भरावयाची महागडी लाखो रूपयांच्या शिक्षण शुल्कामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांची त्यातील अर्धी फी शासनाने भरण्याचा निर्णय घेवून त्याची अंमलबजावणी केलेली आहे. असे असताना केंद्रात व महाराष्ट्रात मंडळ कमिशनची अंमलबजावणी करताना शासकीय संस्थाकडून ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. तो अन्याय दूर करावा, मंडल कमिशनच्या शिफारशीप्रमाणे राज्यात ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात यावी, शासकीय नोकºयामध्ये ओबीसी, कायदे व घटनेतील तरतूदीप्रमाणे संरक्षण व भरती करावी, केंद्र सरकारने मेडिकल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना केवळ दोन टक्के आरक्षण फेटाळून नियमाप्रमाणे २७ टक्के आरक्षण केंद्रात व राज्यात लागू करण्यात यावा, ११ लक्ष शासकीय नोकºयांमध्ये केवळ ८.४५ एवढी ओबीसीची भरती असल्यामुळे, ओबीसीच्या अनुशेषाच्या एक लाख १० हजार जागा तात्काळ सरळसेवा भरतीने भरण्यात याव्या, तसेच ओबीसीच्या प्रलंबित मागण्या तात्काळ पुर्ण करण्याबाबतची विनंती या निवेदनातून करण्यात आली.निवेदन देणाºया शिष्टमंडळात जगदिश जुनगरी, संध्या दुधलकर, राजू साखरकर, मीनाक्षी पहानपटे, सविता पोतराजे, सुरेखा आष्टनकर, विजय माटे, विजल लोणबले, राजेंद्र नागरकर, सुनील ढुमणे, कल्पना माथनकर आदी उपस्थित होते.