चंद्रपूर : महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील अंशुल नावाच्या बालकाला दत्तक मुक्त घोषित करण्यात येणार आहे. त्याच्या संबंधित
पालकांनी सात दिवसांच्या आत बालकाबाबत आपला हक्क दाखविण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी केले आहे.
नागभीड येथील पवन नागरे यांच्या शेतात रोडलगत ३ जून २०२१ रोजी एक दिवसाचा नवजात बालक आढळून आला होता. या बालकाला नागभीड पोलिसांनी काळे चाईल्ड हॉस्पिटल येथे उपचाराकरिता दाखल केले. बालकाची प्रकृती चांगली झाल्यानंतर त्या बालकाला बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर आणण्यात आले. बालकल्याण समितीने बालकाचे नाव आपल्या दप्तरी अंशुल असे नोंदवून, महिला विकास मंडळ द्वारा संचालित, किलबिल प्राथमिक बालगृह-दत्तक योजना, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले आहे.
अंशुलच्या संबंधित पालकांनी सात दिवसाच्या आत बालकल्याण समिती, चंद्रपूर, शासकीय मुलांचे निरीक्षणगृह, बालगृह, डॉ.राजेंद्र आल्लुरवार बिल्डींग,सी-१८, शास्त्रीनगर, किंवा जिल्हा बाल संरक्षण कक्ष द्वारा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जुना कलेक्टर बंगला, जिल्हा स्टेडियम जवळ, चंद्रपूर, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, डॉ. मुठाळ यांच्या जुन्या दवाखान्याजवळ, रामनगर चंद्रपूर येथे संपर्क साधावा. तसेच बालकाबाबत आपला हक्क दाखवावा अन्यथा बालकल्याण समिती, चंद्रपूर अंशुल बालकाला दत्तक मुक्त घोषित करेल आणि किलबिल संस्था दत्तक देण्याच्या प्रक्रियेची सुरुवात करणार आहे.