शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
5
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
6
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
7
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
8
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
9
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
10
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
11
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
12
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
13
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
14
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
15
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
16
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
17
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
18
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
19
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
20
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ

ब्रह्मपुरीत सखी मंचचा वार्षिक महोत्सव विविध कार्यक्रमांनी गाजला

By admin | Updated: February 21, 2017 00:34 IST

लोकमत सखी मंच ब्रह्मपुरी तालुकाच्या वतीने स्वागत मंगल कार्यालयात सखी मंचचा वार्षिक महोत्सव कार्यक्रम रविवारला विविधारंगानी गाजला.

ब्रह्मपुरी : लोकमत सखी मंच ब्रह्मपुरी तालुकाच्या वतीने स्वागत मंगल कार्यालयात सखी मंचचा वार्षिक महोत्सव कार्यक्रम रविवारला विविधारंगानी गाजला. शहरातील बहुसंख्य सखींनी यामध्ये सहभाग घेतला होता. त्याचवेळी सखी मंच सदस्यता मोहीम राबविण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपूर इव्हेंट प्रमुख अमोल कडूकर यांच्या हस्ते करण्यात आले. तर अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष योगिता बनपूरकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ. रवी रणदिवे, शाईन कंपनीचे व्यवस्थापक नईम जिवानी, फिनत जिवानी, चरपटे, केळझरकर, मनिषा बगमारे, अल्का खोकले आदी उपस्थित होते. महोत्सवात सखींनी एकापेक्षा एक अशा वरचढ व रंगतदार नृत्य सादर केले. यावेळी डिश डेकोरेशन स्पर्धेत बेसनापासून तयार होणारे विविध पदार्थाची सुबक मांडणी सखींनी केली होती. डिश डेकोरेशन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रणाली राखडे, द्वितीय अभिलाषा परकरवार, तृतीय प्रेमिला भोयर, एकल नृत्य स्पर्धेत २० ते ३० वयोगटात प्रथम कोमल बुलबुले, द्वितीय शितल नागदेवते, तृतीय शितल खोब्रागडे, एकल नृत्य ३० ते५० वयोगटात प्रथम विशाखा मेश्राम, द्वितीय माया मेश्राम, युगल नृत्य स्पर्धेत प्रथक गीता डांगे व मंजू काटकर, द्वितीय डॉ.शोभना लोकरे व शितल नागदेवते, तृतीय नमिता बनकर व मनिषा गेडाम, समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक डॉ.मनिषा बजवाडे ग्रुप, वयोगट ३० ते ५० मध्ये सुनिता आदे ग्रुप, गायन स्पर्धेत प्रथम पूनम आमवार, द्वितीय जयश्री राऊत व तृतीय सोनाली गाढवे, एकपात्री अभिनय स्पर्धेत प्रथम प्रतिभा कसारे, द्वितीय शिल्पा बनकर, तृतीय अर्चना भोले यांनी पटकावीला. यावेळी सखी मंचद्वारे वर्षभरात राबविण्यात आलेल्या उपक्रमातील सहभाग घेणाऱ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. त्यामध्ये मराठ मोळा साजशृंगार प्रथम क्रमांक प्रियंका पडोळे, द्वितीय अश्विनी बाळबुधे, तृतीय सोनाली गाठवे, प्रोत्साहनपर गीता डांगे, मंगला दवे, साधना केळझरकर, घरगुती गपणती सजावट स्पर्धेत प्रथम सुनीता नवलाखे, द्वितीय अंजली उरकुडे, सामान्य ज्ञान परीक्षेत प्रथम पूनम घोनमोडे, द्वितीय अर्चना मेहर, तृतीय वंदना नागपूरकर, चित्रकला व रंगभरण स्पर्धेत प्रथम ऋतूजा भरणे, द्वितीय शेंडे, तृतीय तन्वी मेंढूले, रंगभरण स्पर्धेत प्रथम ओजस झोडे, द्वितीय समृद्धी हेजिब, तृतीय काव्य आंबोरकर यांना बक्षीसाचे वितरण करण्यात आले. वार्षिक महोत्सवात पुढील सत्रासाठी संयोजिका म्हणून साधना केळझरकर व सह. संयोजिका म्हणून स्नेहा गोस्वामी यांची निवड करण्यात आली. यावेळी ब्रह्मपुरी तालुका कार्यकारिणीला स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सखी मंचतर्फे घेतलेल्या लक्की ड्रा मध्ये प्रिती कऱ्हाडे प्रायोजित पैठणीच्या मानकरी मंगला दंदे तर संगम शोरूम प्रायोजित डिझायनर साडीच्या विजेत्या सुषमा तामशेट्टीवार ठरल्या. त्यांना बक्षीसाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजिका शिल्पा चरपटे, अहवालवाचन साधना केळझरकर, परिचय मनिषा बगमारे, संचालन अल्का खोकले तर आभार संगीता राऊत यांनी मानले. परीक्षक म्हणून सुषमा मेश्राम, विभा सलामे, डॉ.शोभना लोकरे, दिप्ती मोरोडे, सुनंदा मुळे, शकुंतला कोडापे यांनी काम पाहीले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे संचालन अर्चना खंडाते तर आभार अमिता बन्नोरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी चरपटे, केळझरकर, गोसावी, कऱ्हाडे, बन्नोरे, खंडाते, बगमारे, खोकले, राऊत, भजे, ढोमणे, मेंढे, तायडे, कसारे, रणदिवे, रंगारी यांनी प्रयत्न केले. (तालुका प्रतिनिधी)