लोकमत न्यूज नेटवर्कतळोधी (बा.) : अवैध मार्गाने रात्रीच्या वेळेस जनावरांना वाहनात कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती तळोधी (बा.) पोलिसांना मिळताच सर्वत्र नाकेबंदी करून ट्रकला वाटेतच अडवून जनावरांची सुटका करण्यात आली. ही जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचे समजते. या प्रकरणात ट्रकसह आरोपीला अटक करण्यात आली.आरोपी मोहसीन खान पठाण अमीन खान पठाण रा. अड्याळ ता. पवनी हा पवनीवरून ट्रकने (क्रमांक एम एच ४० वाय ९७३९) बैल व गोºहे ही जनावरे कोंबून वाहतूक करीत होता. याची माहिती तळोधी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी सापळा रचला. व वाहनाला वाटेतच अडविले. यात वाहनासह सात लाख ४७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरील कारवाई तळोधी (बा.) पोलिस स्टेशनचे नवनियुक्त ठाणेदार के. आर. राठोड व पी. एस. आय. जितेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संजय मांढरे, वाहतूक पोलीस हवालदार संतोष सोनटक्के, सतिश नेवारे व वाहन चालक शेख दाऊद यांनी केली. पुढील तपास पोलीस हवालदार संजय मांढरे करीत आहे. शेतकऱ्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत जनावरे तस्करीचे रॅकेट सक्रिय झाले आहे.
जनावरे कोंबून नेणारा ट्रक पकडला आरोपींना मुद्देमालासह अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 00:46 IST
अवैध मार्गाने रात्रीच्या वेळेस जनावरांना वाहनात कोंबून नेत असल्याची गुप्त माहिती तळोधी (बा.) पोलिसांना मिळताच सर्वत्र नाकेबंदी करून ट्रकला वाटेतच अडवून जनावरांची सुटका करण्यात आली. ही जनावरे कत्तलखान्याकडे नेत असल्याचे समजते. या प्रकरणात ट्रकसह आरोपीला अटक करण्यात आली.
जनावरे कोंबून नेणारा ट्रक पकडला आरोपींना मुद्देमालासह अटक
ठळक मुद्देतळोधी बा. पोलिसांची कारवाई : कत्तलखान्यात जात होती जनावरे