शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी सेविकांचे जि.प. समोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 01:28 IST

राज्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया बंद करणे, सेवानिवृत्तीचे वय ६५ ते ६० करून १ एप्रिल २०१८ पासून १३ हजार ७०० अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा डाव रचला जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जि. प. समोर आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देमागण्यांकडे वेधले लक्ष : सरकारविरुद्ध घोषणाबाजी

ऑनलाईन लोकमतचंद्रपूर : राज्यातील दहा हजार अंगणवाडी सेविका, मदतनिस आणि मिनी अंगणवाडी सेविकांची भरती प्रक्रिया बंद करणे, सेवानिवृत्तीचे वय ६५ ते ६० करून १ एप्रिल २०१८ पासून १३ हजार ७०० अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा डाव रचला जात असल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी जि. प. समोर आंदोलन करण्यात आले.राज्य सरकारने अंगणवाडी महिलांच्या हिताचे धोरण न राबविता अन्यायकारक आदेश काढून अडचणी वाढवित असल्याचा आरोप अंगणवाडी सेविकांनी केला. सेवानिवृत्तीसाठी साठ वर्षांची अट लागू करणारा जी.आर. रद्द करा, अंगणवाडी महिलांच्या रिक्त जागा तत्काळ भरा, अंगणवाडी महिलांना सेवानिवृत्तीचा लाभ द्या, आदी मागण्यांवरून अंगणवाडी सेविकांनी जोरदार घोषणाबाजी केली. अंगणवाडी सेविकांना मार्गदर्शन करताना प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, ‘अच्छे दिन’ च्या नावाखाली सरकारने शोषित घटकांवर अन्याय सुरू केला आहे. विविध कल्याणकारी योजना गुंडाळण्याच्या हालचाली सरकारने सुरू केल्या आहेत. या अन्यायाविरुद्ध सर्व घटकांनी लोकशाही मार्गाने विरोध केला पाहिजे, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.दरम्यान, शिष्टमंडळाचे वतीने मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापडकर तसेच उपमुख्याधिकारी संजय जोल्हे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात ३५ मागण्यांचा समावेश होता. या मोर्चात सुरेखा तितरे, प्रणीता लांडगे, पवित्रा ताकसांडे, शोभा बोगावार, वर्षा तिजारे, वंदना जीवने, रेखा ढेंगळे, कुंदा वाघमारे, ललीता चौधरी, वैशाली बोकारे, वंदना मुळे, रेखा रामटेके, सिंधू मगरे, उर्मिला नगराळे, सुशीला कर्णेवार, लता अहीरकर, गुजाबाई डोंगे, संगीता देशमुख, विद्या निब्रड, बंडू पहानपटे आदींसह बहुसंख्य अंगणवाडी सेविकांचा सहभाग होता.