शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

...आणि 'ती' शिक्षिका ढसढसा रडली, गेडामगुडा जि. प. शाळेचे वेदनादायी वास्तव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 10:36 IST

ही कहाणी आहे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन स्थलांतरीत करण्याच्या शासन निर्णयाचा फटका बसलेली जि.प.प्राथमिक शाळा गेडामगुडा या शाळेची.

- आशिष देरकर

कोरपना(चंद्रपूर) :  आयएसओ नामांकन प्राप्त शाळा, शाळासिध्दीमध्ये 'अ' श्रेणीत असणारी शाळा, शालेय परीसरात सुंदर बाग, बागेत फुलझाडे, फळझाडे व शालेय पोषण आहारात भाज्या व तितकीच सुंदर, गुणवत्ताधारी शाळेतील छोटी पाखरं. या शाळेतील मुलांना घडवताना तिने अक्षरशः जीवाचं रान केलं. परंतु आज शाळेला सोडून जाताना ती शिक्षिका ढसढसा रडली.होय ही कहाणी आहे १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करुन स्थलांतरीत करण्याच्या शासन निर्णयाचा फटका बसलेली जि.प.प्राथमिक शाळा गेडामगुडा या शाळेची.

पंचायत समिती कोरपना असलेली जि. प. प्राथमिक शाळा गेडामगुडा या जेमतेम आठ पटसंख्या असलेल्या शाळेत मुख्याध्यापक लहू नवले व शिक्षिका कांचन लांबट हे दोन शिक्षक कार्यरत आहेत. शिक्षकांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळेत सुंदर फुलबाग व फळबाग फुलविली. शाळेची रंगरंगोटी केली व शाळेची गुणवत्ता वाढवून  आयएसओ मानांकनासोबत शाळासिध्दीमध्ये शाळा 'अ' श्रेणीत आणली .शाळेची पटसंख्या आठ असली तरीही केंद्रस्तरावरील व तालुकास्तरावरील नवरत्न स्पर्धेत येथील विद्यार्थ्यांचा हमखास क्रमांक असायचा.अशी ही परिश्रमाने घडवलेली शाळा सोडताना मुख्याध्यापक लहू नवले यांची पावले जड झाली होती. तर सहायक  शिक्षिका कांचन लांबट ह्या ढसढसा रडल्या.  गावकऱ्यांनी तर शाळेला कुलुपच लावू दिले नाही. हसरी आणि टवटवीत फुलांची बागही कोमेजून गेली होती.आमची शाळा आमच्या गावाची शान आहे. त्यामुळे शाळा बंद करू नये यासाठी गावकऱ्यांनी एकच टाहो फोडला. प्रत्येक विद्यार्थी व पालकांचे चेहरे कोमजलेले होते. गावातील शाळा सुरु झाली नाही तर नेत्यांना गावबंदी करण्याचा इशाराच जणू गेडामगुडा वासीयांनी दिला आहे.

 कोरपना तालुक्यातील उपक्रमशील व आदर्श शाळा म्हणून गेडामगुडा जिल्हा परिषद शाळेची ओळख आहे. तेथील उपक्रम पाहून इतर शाळांतील शिक्षकांना गेडामगुडा शाळेचे आम्ही उदाहरण देत होतो. व एकदा तरी या शाळेला भेट देण्याची विनंती करीत होतो. १०० टकक़े आदिवासी गेडामगुडा या गावातील शाळा जरी आदर्श असली तरी मात्र शासनाच्या निर्णयापुढे आम्ही काहीच करू शकत नाही.- रवींद्र लामगे, शिक्षण विस्तार अधिकारी