शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

अन् तिला मृत्यूच्या दाढेतून आणले परत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 22:58 IST

अडीच वर्षापूर्वी एका मातेने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र या नवजात बाळाला अतिशय दुर्धर आणि दुुर्मिळ आजाराने ग्रासले असल्याचे डॉक्टरांना लक्षात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत चार तासांची शस्त्रक्रिया पार पडून तिला वाचविण्यात आले. आज ‘परी’ नामक ही मुलगी सुदृढ आयुष्य जगत आहे.

ठळक मुद्देनवजात बाळावर चार तासांची शस्त्रक्रिया : अन्ननलिका थेट श्वसननलिकेला जुळली होती

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : अडीच वर्षापूर्वी एका मातेने गोंडस मुलीला जन्म दिला. मात्र या नवजात बाळाला अतिशय दुर्धर आणि दुुर्मिळ आजाराने ग्रासले असल्याचे डॉक्टरांना लक्षात आले. अत्यंत कठीण परिस्थितीत चार तासांची शस्त्रक्रिया पार पडून तिला वाचविण्यात आले. आज ‘परी’ नामक ही मुलगी सुदृढ आयुष्य जगत आहे. ही किमया येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुप पालिवाल यांनी साधली. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डा. एस.एस. मोरे, बालरोग तज्ज्ञ डॉ. एम.जे. खान यांनी त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अडीच वर्ष सदर मुलगी डॉक्टरांच्या निरीक्षणात होती.परी दिनेश गनोरकर हिचा जन्म ६ मे २०१६ रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे झाला. तिची आई सारिका दिनेश गणोरकर, रा. भादेंवाडी, भोलेनगर, नागपूर येथील रहीवासी असून हे कुटुंब रोज मजुरी करुन आपला उदरनिर्वाह करतात. परीचा जन्म झाल्यावर तिसऱ्या दिवशी तिला अतिदक्षता विभागात भरती केली असता त्या विभागातील विभागप्रमुख डॉ. एम. जे. खान व त्यांचे सहकारी डॉ. मनोज भटनागर, डॉ. सोनारकर व डॉ. राहुल भोंगळे यांनी तिची तपासणी केली. यात परीला गंभीर व दुर्मिळ आजार असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. या आजारात अन्ननलिकेचा प्रवाह पोटात न जाता श्वसनलिकेत जात असतो. अशा परिस्थितीत बाळाने घेतलेले दुध सरळ फुफ्फुसात जात असते. यामुळे फुफ्फुसाचा निगोनिया होण्याचा धोका व बाळाच्या पोटात अन्न न गेल्यामुळे बाळ दगावण्याचा धोका असतो. हा आजार साडेतीन हजार बाळांपैकी एकाला होतो. परीचा जन्म झाला, तेव्हा तिचे वजन १९०० ग्राम होते. अशा परिस्थितीत डॉ. अनुप पालिवाल यांनी बाळावर चार तास शस्त्रक्रिया करुन अन्ननलिकेची नळी पोटाला जोडण्यास यश मिळविले. बाळाला कृत्रिम श्वासाच्या मशिनवर ठेवण्यात आले. यावेळी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. मोरे यांनी बाळाला लागलेल्या प्रत्येक औषधी व वस्तू वैयक्तिक लक्ष घालून उपलब्ध करुन दिले. या कामात अतिदक्षता विभागातील सर्व नर्सिंग स्टॉफ यांनी मोलाचे सहकार्य केले. दरम्यान, ८ जानेवारी २०१९ रोजी परी व तिची आई तपासणीसाठी आली असता परी सुदृढ असल्याचे पाहून डॉ. पालिवाल यांनी समाधान व्यक्त केले. आज परी अडीच वर्षाची झाली आहे.