शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

...अन् 'त्या' शेतकऱ्याच्या फक्त पाय व डोक्यावरच करावे लागले अंत्यसंस्कार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 07:20 IST

Chandrapur News ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील देविदास गायकवाड या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात गुरुवारी मृत्यू झाला.

ठळक मुद्देवाघाने शेतकऱ्याला फाडून खाल्ले

राजकुमार चुनारकर

चंद्रपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ असलेल्या सोनेगाव (बेगडे) येथील देविदास गायकवाड या शेतकऱ्याचा वाघाच्या हल्ल्यात गुरुवारी मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत हल्लेखोर वाघाने रामदासच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. नातेवाईक व गावकऱ्यांच्या हाती रामदासचे फक्त पाय व डोके सापडले. त्यामुळे नागरिकांना केवळ डोके व पायावरच अंत्यसंस्कार करावे लागले. यावेळी प्रत्येकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते.

चिमूर तालुक्यातील अनेक गावांच्या सभोवताली ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे जंगल लागून असल्याने अनेक गावांच्या लगत वाघांचे वास्तव्य आहे. दोन दिवसांपूर्वी चिमूर परिसरात सकाळी फिरायला जाणाऱ्या अनेकांना वाघाचे दर्शन झाले होते. अनेक जनावरांचा वाघाकडून फडशा पाडला जात आहे.

वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या रामदासकडे चार-पाच एकर शेती असल्याने रामदास शेतीतूनच आपल्या परिवाराचे पालनपोषण करत होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी असा परिवार आहे. गुरुवारी रामदास नेहमीप्रमाणे शेतावर गवत कापण्यासाठी गेला होता. गवत कापत असताना वाघाने हल्ला करून रामदासच्या नरडीचा घोट घेतला. ही घटना सायंकाळची असल्याने व अंधार झाल्याने गावकरी रामदासचा शोध घेऊ शकले नाहीत. दुसऱ्या दिवशी नातेवाईक व गावकऱ्यांनी घटनास्थळावर जाऊन पाहिले असता, वाघाने रात्रभर शरीरातील बराच भाग खाल्ला होता. त्यात फक्त डोके व दोन पाय शिल्लक उरले होते. मृताचे आप्तजन तिरडीवर नेऊन मोक्षघाटावर अंतिम संस्कार करतात. मात्र, ३९ वर्षीय रामदासच्या नशिबी मात्र वेगळेच होते. आयुष्यातील शेवटच्या क्षणातील अंतिम विधीचे सौख्यही त्याला मिळाले नाही.

टॅग्स :Tigerवाघ