शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

शिक्षकांच्या वेतनातून वसूल होणार वाहन भत्त्याची रक्कम

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 13:09 IST

स्थानिक निधी लेखा परीक्षण अहवाल: उन्हाळी सुटीमध्ये दिला वाहन भत्ता

साईनाथ कुचनकार लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : उन्हाळ्यात शाळांना सुटी महिन्यातील वाहन भत्ता प्रशासनाने असतानाही मे आणि जून या शिक्षकांच्या वेतनात अदा केला. ही बाब स्थानिक निधी लेखा परीक्षणात उघडकीस आली. यानंतर ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या सप्टेंबर महिन्याच्या वेतनातून वाहन भत्ता रक्कम वसूल केली जाणार आहे. या प्रकारामुळे शिक्षकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या शिक्षकांना मे आणि जून २०२३ च्या वेतन देयकात वाहन भत्ता अदा करण्यात आला. स्थानिक निधी लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यात आला. या अहवालामध्ये सुटी असतानाही भत्ता अदा कसा करण्यात आला, असा आक्षेप घेण्यात आला आहे. महाराष्ट्र शासन वित्त विभाग परिपत्रक ९ मे २००३ प्रमाणे ३० दिवसांपेक्षा दीर्घ सुटी कालावधीत वाहतूक भत्ता अनुज्ञेय नाही. शिक्षकांना दरवर्षी १ मे ते ३० जून या कालावधीत दीर्घ सुटी असते. उन्हाळी सुटीत वाहतूक भत्ता देय नसतानाही अदा करण्यात आल्याचे लेखा परीक्षण अहवालात म्हटले आहे. 

वसुलीची जबाबदारी मुख्याध्यापकांवर वाहन भत्ता अदा केल्यानंतर आता सावरासावर केली जात आहे. दरम्यान, ब्रह्मपुरी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांना पत्र पाठवून अदा केलेला वाहन भत्ता सप्टेंबर २०२४ च्या वेतन देयकात वसूल करण्याचे तसेच देयक ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

६ लाख ३२ हजार ४२६ होणार वसूल ब्रह्मपुरी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांच्या सप्टेंबर महिन्यातील वेतनातून आता अदा केलेली रक्कम परत घेतली जाणार आहे. यामध्ये ६ लाख ३२ हजार ४२६ रुपये वसूल केले जाणार आहेत.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरzp schoolजिल्हा परिषद शाळा