शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

रक्कम पूर्ण, मात्र घरकूल अर्धवट

By admin | Updated: March 25, 2015 01:27 IST

कोरपना पंचायत समिती अंतर्गत सन २०१० ते २०१४ पर्यंत ५३ ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचे वाटप करण्यात आले.

नांदाफाटा: कोरपना पंचायत समिती अंतर्गत सन २०१० ते २०१४ पर्यंत ५३ ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचे वाटप करण्यात आले. यात काही गावातील घरकुलासाठी पूर्ण रक्कमही देण्यात आली. मात्र घरकुलाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सोबतच सन २०१०- २०१२ पर्यंतच्या मंजूर घरकुलासाठी ६८ हजार रुपये मंजूर असताना तेच घरकुल वाढीव रकमेतील सन २०१३-१४ च्या योजनेत मंजूर झाल्याचे दाखवून ९५ हजारपर्यंत रक्कमेच्या देयकांचे वितरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये नमुना आठमध्ये पक्क्या घराची नोंद असणाऱ्यांनाही घरकुलाची मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पिपर्डा, पारधीगुडा, उमरहिरा, कोडशी बु., मांडवा आदी गावांमध्ये घरकुलाची कामे अद्यापही अर्धवट आहे. याबाबत काही महिन्यापूर्वी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर आता विधानसभेत आमदार आरीफ नसीम खान यांनी या प्रकरणाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.नुकतीच चौकशी समिती कोरपना येथे दाखल झाली असून चार ते पाच अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती पुढे आली आहे. देयके वाटप करुनही घरकुल पूर्ण न झालेली बहुतांश गावे आदिवासी बहुल भागात असून विचारणा करण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे समजते. काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेऊन गावे बीपीएल यादीतून वगळल्यानंतरही अशा नागरिकांच्या नावे घरकुलाचे वाटप झाले कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तालुक्यात जवळपास २४० ते २५० हून अधिक घरकुलाचे काम अद्यापही अर्धवट असल्याचे समजते. सदर अर्धवट घरकुलाचे काम स्वखर्चाने पूर्ण करण्याची लाभार्थ्यांची ऐपत नसून त्यांना कच्च्या घराचा आसरा घेत कुटुंबाचा उर्दरनिर्वाह करावा लागत आहे. तर कुठे बांबूच्या ताटव्यांमध्ये आदिवासी बांधव राहत आहे. त्रिस्तरीय सदस्य समितीच्या अहवालातून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)