गत वर्षभरापासून कोरोना महामारीच्या गंभीर संकटाशी शेतकरी वर्ग संघर्ष करीत आहे. जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा संघर्ष करून कर्ज काढून शेतीची मशागत करून शेतपिकाचे उत्पादन घेत असतो. उत्पादित झालेल्या शेत मालास योग्य भाव मिळत नसल्याने, आधारभूत दर असलेली दि महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि. शाखा चंद्रपूर ही सहकारी संस्था असून, या संस्थेच्या माध्यमातून धान खरेदी करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या नोंदणीनुसार ७९८५१९.६५ क्विंटल धान खरेदी करण्यात आले होते. १२ मार्च, २०२१ नंतरच्या २२९५९०.२९ क्विंटल पिकाचे मूल्य प्राप्त होण्यास पत्रव्यवहार सुरू केला व शासनाचे या गंभीर बाबीकडे लक्ष वेधले. आमदार भांगडिया यांनी तत्काळ दखल घेत शासनाशी पत्रव्यवहार करून, प्रत्यक्ष भ्रमणध्वनीवरून संबंधित यंत्रणेशी संवाद साधून, चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी परिश्रम घेतले. अखेर त्यांच्या पत्राला यश आले असून, गुरुवारी राज्य शासनाने ४२ कोटी रुपये रिलीज केले आहेत.
धान उत्पादकांना मिळणार आधारभूत मूल्याची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:29 IST