शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

१६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 00:40 IST

स्थानिक गुन्हे शाखेने जनता कॉलेज चौकात नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्र. एमएच ४० के आर २७२९ ची झडती घेतली. यावेळी वाहनात सहा लाख रुपये किंमतीची ४० पेट्या विदेशी दारु आढळून आली.

ठळक मुद्देदोघांना अटक : एलसीबीच्या पथकाची कारवाई

ऑनलाईन लोकमत चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेने जनता कॉलेज चौकात नाकाबंदी करुन चारचाकी वाहन क्र. एमएच ४० के आर २७२९ ची झडती घेतली. यावेळी वाहनात सहा लाख रुपये किंमतीची ४० पेट्या विदेशी दारु आढळून आली.याप्रकरणी पोलिसांनी चारचाकी वाहनासह १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन वैभव वसंत गोमासे (३३), कन्हैया किसन साळंूखे (३३) दोघेही रा. वर्धा या दोघांना अटक केलीे. ही कारवाई शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने केली.नागपूरवरुन चारचाकी वाहनातून दारुची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास मिळाली. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने जनता कॉलेच चौकात नाकाबंदी करुन वाहनातून दारुसाठा जप्त केला. यावेळी पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता, सदर दारु मध्यप्रदेशमधील मूलताई येथून शहरातील खंजर चौकात उतरविण्यात येणार असल्याची माहिती आरोपींनी दिली. ही कारवाई पीएसआय वैरागडे यांच्याही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सुधाकर अंबोरे यांच्या मार्गदर्शनात पीएसआय सुनील उईके, एसआय दौलत चालखुरे, पद्माकर भोयर, महेंद्र बुजारे, कुंदनसिंग बाबरी, प्राजंल झिलपे, पंजाब मडावी आदींनी केली. शुक्रवारी संध्याकाळीसुद्धा स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय वैरागडे यांच्या नेतृत्वातील चमूने चारचाकी पीकअप वाहनातून १९ पेट्या दारु जप्त केली होती. यावेळी एका आरोपीस अटक करण्यात आली. दोन मोठ्या कारवाईने अवैध दारुविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.