लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही ठाण्यांतर्गत नाकाबंदी करून १० लाखांच्या दारूसह १५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नवरगाव मार्गावर केली. एकाला अटक तर दुसरा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.सुदर्शन उर्फ दर्शन राजु किन्नाके (२२) रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.सिंदेवाही येथे एका वाहनाने काही इसम दारूचा पुरवठा करणार आहेत, अशी माहिती पोलीस पथकाला मिळाली. दरम्यान, नवरगाव मार्गावरून वाहन येत असताना थांबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, वाहन न थांबता पुढे निघून गेले. पोलीस पथकाने सदर वाहनाला नवरगाव मार्गावरील जंगलातून ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता वाहनामध्ये एकाला अटक करण्यात आली तर दुसरा अंधाराचा फायदा घेवून पसार झाला होता. वाहनामध्ये १० लाखांची देशी व ७२ हजारांची विदेशी दारूसह १५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर गुन्हा पोलीस सिंदेवाही ठाण्यात दाखल करण्यात आला.आरोपी नामे सुदर्शन उर्फ दर्शन राजु किन्नाके (२२) रा. शास्त्री वार्ड, हिंगणघाट, वर्धा यास अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक ओ. जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वैरागडे, संगीडवार, अविनाश दशमवार, अमजद खान आदींनी केली.वरोऱ्यात १५ दारू विक्रेत्यांविरूद्ध गुन्हावरोरा ठाणेअंतर्गत १५ दारू विक्रेत्यांविरूद्ध रविवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. वरोरा येथील यात्रा वॉर्डातील आशिर्वाद नगर, टेमुर्डा, जगन्नाथबाबा नगरातून २ लाख ७९ हजार ९०० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रभारी पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक मिश्रा, घागे, पेंढारकर आदींनी केली. मागील आठवड्यातही १० जणांना अटक झाली होती. दारूविक्रीमुळे वॉर्डातील महिला त्रस्त झाल्या आहेत.इंदिरा नगरात सहा जुगाऱ्यांना अटकइंदिरा नगरात जुगार खेळणाऱ्या सहा जणांना रामनगर पोलिसांनी रविवारी दुपारी अटक केली. आरोपींकडून १७ हजार ६९० रूपये जप्त केले. जुगार सुरू असल्याची तक्रार वॉर्डातील नागरिकांनी ठाण्यात केली होती. त्यामुळे छापा टाकून सहा जणांवर गुन्हा दाखल केला.
१५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 23:01 IST
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिंदेवाही ठाण्यांतर्गत नाकाबंदी करून १० लाखांच्या दारूसह १५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही घटना रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास नवरगाव मार्गावर केली. एकाला अटक तर दुसरा फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
१५ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त
ठळक मुद्देगुन्हे शाखेची कारवाई : आरोपीला अटक