शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णवाहिकेत शुभमंगल; नवराई अचानक आजारी पडली, तरी मुहूर्तावरच लगीनगाठ बांधली! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 18:11 IST

क्षुल्लक कारणांवरुन लग्न मोडल्याचे प्रकार आपण नेहमी पाहतो. मात्र

रात्री तिच्या अंगाला हळद लागली. दुसऱ्याच दिवशी तिचा विवाह होणार असल्याने ती भावी आयुष्यातील सोनेरी स्वप्नांत जणू हरवूनच गेली होती. काही तासांनंतर येणाऱ्या अडचणीच्या वेळेची तिला कल्पनाच नसावी..?? पहाटे साडेचार ते पाच वाजताच्या दरम्यान अचानक तिची तब्बेत बिघडली, आणि तिला चंद्रपुर च्या खाजगी दवाखाण्यात हलवावे लागले. तिथूनही तिला नागपूर ला घेऊन जाण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याने तिला रूग्णवाहीकेत टाकुन नागपूर च्या दिशेने तिचा प्रवास सुरू झाला. तिला घेऊन जाणारी रूग्णवाहिका जेमतेम वरोऱ्या पर्यंत पोहचली आणी.... *

पोंभूर्ण्यापासुन ७ किमी. अंतरावर असलेल्या चिंतलधाबा येथिल भुजंगराव सोयाम यांची मुलगी वैशाली हिचा विवाह गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथिल सेवानिवृत्त शिक्षक दलपतराव आत्राम यांचा मुलगा गणेश यांच्याशी ९ मे रोजी होण्याचा मुहूर्त ठरला होता. आदल्या रात्री तिला " नवरी " करण्यात आले होते. सकाळी अचानक वैशाली ची प्रकुर्ती खालावली आणि तिला चंद्रपुर च्या खाजगी रूग्णालयात भरती करण्यात आले. नवऱ्यामुलीची प्रकुर्ती खालावल्याचा निरोप वर पक्षाकडील मंडळींनाही देण्यात आला. वर पक्षाकडील  मंडळी ताबडतोब चिंतलधाब्यात दाखल झाली. वर पक्षाकडील मंडळीना भलत्याच शंकेने घेरले गेल्याचे एेकीवात आले आहे. 

प्रत्यक्षदर्शी गांवकरी मंडळी व पाहुणे मंडळी कडून मिळालेल्या माहीती प्रमाने वर पक्षाकडील मंडळीना वधुमुलगी एखाद्या प्रियकरासोबत पळून गेली असावी, असा संशय आला होता. त्यामुळे - मुलीच्या आई - वडिलाने चार दिवसानंतर लग्न लावण्याची विनंती करूनही वर पक्षाकडिल लोकांनी वैशाली च्या आई - वडिलांची विनंती धुडकावून लावली. लग्न लावायचे असेल, तर आजच..!! असा हेका धरला. तब्बेत खराब असेल तर बोलवा, लग्न लाऊन परत दवाखाण्यात नेता येईल असा संशयास्पद सल्ला ही वर पक्षाकडून देण्यात आला. 

नवरदेवाची वरात चिंतलधाब्यात दाखल झाली होती. मुलीकडील मंडळी नवरदेवासह त्याच्या कडील मंडळींना समजावण्याचा प्रयत्न करीत होती, परंतु नवरदेवाकडील मंडळी चार दिवसानंतर लग्न लावण्याच्या मानसिकतेत नसल्याचे गांवकऱ्यांकडून सांगण्यात आले. शेवटी वरोऱ्या पर्यंत पोहोचलेल्या वैशाली ला रूग्णवाहीकेसह वापस बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. रूग्णवाहिका वैशाली ला घेऊन थेट लग्न मंडपात दाखल झाली. नवरी मुलगी सलाईन सह रूग्णवाहीकेत, व नवरदेव रूग्णवाहिकेच्या बाजुला उभा करून शेकडो वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत मंगलाष्टकांसह हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. आज ही गांवा - गांवात ह्या विवाहाची चर्चा सुरू होती...