शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यात अंबाडी सरबत उद्योगास वाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 14:26 IST

Chandrapur News Ambadi उन्हाळ्यात उन्हाची काहिली कमी करणारा आणि खेडयांमध्ये घरोघरी वापरल्या जाणाऱ्या अंबाडीच्या सरबत उद्योगास नागभीड तालुक्यात मोठा वाव आहे. मात्र त्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे.

ठळक मुद्देअनेक ठिकाणी बनविली जाते भुकटी

घनश्याम नवघडेलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर: उन्हाळ्यात उन्हाची काहिली कमी करणारा आणि खेडयांमध्ये घरोघरी वापरल्या जाणाऱ्या अंबाडीच्या सरबत उद्योगास नागभीड तालुक्यात मोठा वाव आहे. मात्र त्या दिशेने सकारात्मक प्रयत्न होण्याची गरज आहे.नागभीड तालुक्यात धानाची शेती होते. पाऱ्यांवर तुरी लावल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात प्रत्येक शेतकºयांच्या शेतातील पाºयांवर ही वनस्पती अगदी सहज उगवते. या वनस्पतीच्या पाल्याचा उपयोग भाजीमध्येही मोठया प्रमाणात करण्यात येतो. आयुर्वेदात आंबाडीला मानाचे स्थान आहे.दिवाळीच्या सुमारास आंबाडी परिपक्व होते. परिपक्व झाल्यानंतर आंबाडीचे फळ लालभडक होते. चवीला आंंबट असल्याने या फळाचा ग्रामीण भागात भाजीमध्येही उपयोग केला जातो. मात्र या आंबाडीचा सर्वात जास्त उपयोग सरबतासाठी केला जातो. फळ परिपक्व झाले की आंबाडीचे झाडांची कापणी करून ते घरी आणले जाते. नंतर फळावरील लालभडक दिसणारा भाग वेगळा करून तो वाळवले जातो. चांगला वाळल्यानंतर खलबत्त्यामध्ये बारिक कूट केला जातो. नंतर बारिक करण्यात आलेल्या या कुटाचा उन्हाळ्यात सरबतासाठी उपयोग करण्यात येतो.एखादा मोठा उद्योग येण्याची गरजव्यावसायिक रूपाने या आंबाडीवर प्रक्रिया करून त्याचे सरबत तयार करण्यात आले तर या आंबाडीच्या पिकास चालना मिळू शकते. मागणी वाढल्यास शेतकरी आंबाडीचे पीकही घेऊ शकतात. उद्योगाचे रूप दिल्यास काही तरूणांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. यासाठी एखाद्या उद्योजकाने पुढे येण्याची गरज आहे.

टॅग्स :agricultureशेती