पोलीस दलाचा उपक्रम : कामात येणार पारदर्शीपणाचंद्रपूर : स्वातंत्रोत्तर काळातील झालेली वैज्ञानिक प्रगती, लोकसंख्येची वाढ, वाढते शहरीकरण, वाढते औद्योगिकीकरण त्याचबरोबर वाढतक जातीयवाद, दहशतवादी संघटनाच्या कारवाया या पार्श्वभूमीवर घडत असलेले विविध प्रकारचे गुन्हे, घटना व देशात इतरत्र घडणाऱ्या घटनांचे इतरत्र उमटणारे पडसाद यामुळे पोलिसांच्या कामात व जबाबदारीमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबरच बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत नागरिकांच्या पोलिसांकडूनच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. या सर्व गोष्टी दूर करून कामात पारदर्शीपणा आणण्यासाठी सर्व पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार असून लाईव्ह मॉनिटरींग पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.समाजात, जिल्ह्यात, राज्यात एवढेच नाही तर देशात घडणाऱ्या घटना व समस्यांशी पाोलीस हा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे निगडीत होऊ लागलेला आहे. बदलत्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी व वाढत्या जबाबदाऱ्या समर्थपणे स्वीकारुन समस्यांची योग्य प्रकारे सोडवणूक करण्यासाठी पोलिसांना सतत दक्ष राहून जनतेला विश्वास संपादन करणे अत्यंत गरजेचे आहे. पोलिसांच्या दैनंदिन कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने चंद्रपूर जिल्ह्यातील ३४ पोलीस ठाणे तसेच सहा उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात प्रत्येकी चार सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्याचे लाईव्ह मॉनिटरींग पोलीस अधीक्षक कार्यालयात ठेवण्यात येणार आहे.पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर जिल्हा पोलीस दलात नवनविन उपक्रम राबविण्यात येत असून त्यामध्ये सायबर लॅब, मोबाईल सीसीटीव्ही व्हॅन, संपूर्ण चंद्रपूर शहरातील आंत व बाहेर जाणारे रस्त्यावर व वर्दळीचे ठिकाणी सीसीटीव्ही व त्यांचे नियंत्रण कक्ष १०२ स्थापन करण्यात आले आहे. पोलीस वसाहत व इतर बऱ्याच प्रकल्पाची सुरूवात चंद्रपूर जिल्हापासून होत आहे. अशा सर्व स्तुत्य व अभिनव यशस्वी उपक्रमाच्या निधी उपलब्धतेसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार तसेच जिल्हा नियोजन समिती यांचे सहकार्य मिळत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
सीसीटीव्ही निगरानीखाली येणार सर्व पोलीस ठाणे
By admin | Updated: September 10, 2016 00:53 IST