वार्ड क्रमांक १ मधून माजी सरपंच प्रदीप महाकुलकर, सुषमा उताने, वार्ड क्रमांक २ मधून सुनील माडेकर आणि छाया पिंपळकर, वार्ड क्रमांक ३ मधून मोहन आसेकर, कल्पना घोसरे व दीपाली काळे असे सात सदस्य अविरोध निवडून आले. पानवडाळा गावची लोकसंख्या ८५० असून, मतदार ६४० आहेत.
ही निवडणूक अविरोध होण्यासाठी माजी सरपंच प्रदीप महाकुलकर यांच्यासह सुरेश घोसरे, गजानन उताने, लहूजी बोथले, श्रीकृष्ण आस्वले, रवींद्र घोसरे, गुणवंत उताने, नीलेश उताने, पंढरी पिंपळकर, सूर्यकांत विधाते, नामदेव महाकुलकर, राकेश जुनघरे, ईश्वर उताने, वासुदेव माडेकर, तुळशीराम महाकुलकर, गणेश बोथले, विठ्ठल पिंपळकर, भाऊराव महाकुलकर, संजय काळे यांनी प्रयत्न केले.