शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

मोदी लहरने अहीरांची ऐतिहासिक हॅट्ट्रिक

By admin | Updated: May 16, 2014 23:53 IST

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी उद्योग भवनात पार पडली. यात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विक्रमी मते घेवून विजयाची हॅट्रीक ..

चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी उद्योग भवनात पार पडली. यात भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी विक्रमी मते घेवून विजयाची हॅट्रीक साधत राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक कार्यमंत्री व काँग्रेसचे उमेदवार संजय देवतळे यांचा २ लाख ३६ हजार २६९ मतांनी दारूण पराभव केला. अंतर्गत गटबाजीची काँग्रेसला बसलेली ही चपराक पुढील राजकारणासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी आघाडी घेतली होती. अंतिम फेरीपर्यंत ती सातत्याने कायम राहिली. मतदार संघातील एकूण १७ लाख ५२ हजार ६१५ मतदारांपैकी ११ लाख ८ हजार ५७३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीत हंसराज अहीर यांना पाच लाख ८ हजार ४९ एवढी मते पडली तर काँग्रेसचे संजय देवतळे यांनी दोन लाख ७१ हजार ७८0 मते घेतली. पूर्वाश्रमीचे शेतकरी संघटनेचे नेते व आपचे उमेदवार अँड. वामनराव चटप यांना दोन लाख चार हजार ४१३ एवढय़ा मतांवरच समाधान मानावे लागले. त्यापाठोपाठ बहुजन समाज पार्टीचे उमेदवार हंसराज कुंभारे हे ४९ हजार २२९ एवढी मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. १८ उमेदवार रिंगणात होते. वरील तीन प्रमुख उमेदवार वगळता १५ उमेदवारांची डिपाझीट जप्त झाली. यात बसपाचे हंसराज कुंभारे यांच्यासह अशोक खंडाळे (रिपाइं), कुरेशी म. इखलाख म. युसूफ, रोशन घायवन (रिपब्लिकन पक्ष खोरीपा), नितीन वसंतराव पोहाणे, नंदकिशोर गंगाराम रंगारी, पंकजकुमार शर्मा (तृणमुल काँग्रेस), फिरोज उस्मान खान पठाण, सिध्दार्थ रमेशचंद्र राऊत, अतुल अशोक मुनगीनवार, कार्तीक गजानन कोडापे, नामदेव माणिकराव शेडमाके, प्रमोद मंगरुजी सोरते, विनोद दिनानाथ मेश्राम, संजय निलकंठ गावंडे यांचा समावेश आहे.

संजय देवतळे दुसर्‍या क्रमांकावर असले तरी विजयी उमेदवारातील अंतर बरेच मोठे आहे. आम आदमी पक्षाचे वामनराव चटप यांचे मताधिक्य गेल्या वेळेपेक्षा वाढले आहे. असे असले तरी अनेकांचे निवडणूकपूर्व अंदाज मात्र चुकले आहेत.

दरम्यान, येथील उद्योग भवनात मतमोजणी केली जाणार असल्याने शुक्रवारी सकाळी ७.३0 वाजपासून नागरिकांची बसस्थानक व उद्योगभवन परिसरात गर्दी होऊ लागली. मात्र सकाळी ८.३0 वाजेपर्यंत जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी मतमोजणीला सुरुवातही केलेली नव्हती.

त्यामुळे उत्सुक नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात येत होता.