वरोरा : सात वर्षांपूर्वी सोयाबीन पिकावर लष्करी अळीने हल्ला केल्याने सोयाबिनचे उत्पादन शेतकऱ्यांना झाले नाही. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, याकरिता वरोरा तालुक्यातील खांबाडा गावात नागपूर- चंद्रपूर मार्गावर शेतकऱ्यांना घेऊन सात वर्षांपूर्वी तत्कालीन खा. हंसराज अहीर यांनी आंदोलन उभारले होते. त्यामध्ये पोलिसांनी हंसराज अहीर यांच्यासोबत ४४ व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल केले. याप्रकरणी सर्वाची न्यायालयाने सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.२५ आॅगस्ट २००८ रोजी खांबाडा गावानजीकच्या नागपूर- चंद्रपूर मार्गावर सोयाबीन उत्पादक शेतकरी लष्करी अळीने संकटात सापडला असल्याने शेतकऱ्यांना प्रति एकरी दहा हजार रुपये नुकसान भरपाई व अनुदान देण्याच्या मागणीकरिता शेतकरी व भाजपा पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना घेऊन अहीर यांनी आंदोलन उभारले होते. याप्रकरणी वरोरा पोलीसांनी कलम १४३, ३४१, ४२७, भादंवि व १३५ मुंबई पोलीस कायद्या अंतर्गत हंसराज अहीर, सुधीर उपाध्याय, रामुसिंग गोपाल वर्मा, बाबा भागडे, सुनिता काकडे, नरेंद्र जीवतोडे, धनंजय पिंपळशेंडे, सतिश दांडगे यांच्यासह ४४ व्यक्तींवर कारवाई केली होती. (तालुका प्रतिनिधी)
अहीर यांच्यासह ४४ व्यक्तींची निर्दोष मुक्तता
By admin | Updated: February 5, 2016 00:46 IST