शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
2
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
3
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
4
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
5
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
6
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
7
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
8
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
9
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
10
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
11
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
12
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
13
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
14
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
15
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
16
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
17
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
18
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
19
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
20
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय

अगरबत्ती प्रकल्पामुळे महिलांना रोजगार

By admin | Updated: April 13, 2017 00:49 IST

बफरझोन क्षेत्रातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यातून आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी,...

पळसगावात प्रकल्प : वनविभागाकडून रोजगार निर्मितीवासेरा: बफरझोन क्षेत्रातील महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा, त्यातून आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल व्हावी, या उद्देशाने पळसगाव (पिपर्डा) वनपरिक्षेत्रासाठी पळसगाव येथे अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात आला. त्यातून अनेक बेरोजगार महिलांना रोजगार मिळाला आहे. शामाप्रसाद जनवन विकास योजना पळसगावतंर्गत १ जानेवारीपासून ताडोबा अगरबत्ती प्रकल्प जनधन विकास योजना पळसगाव या नावाने अगरबत्ती प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. सदर प्रकल्प वनपरिक्षेत्र अधिकारी एस. व्ही. मुरकुटे यांच्या प्रयत्नातून कार्यान्वित झालेला आहे.सदर प्रकल्पावर २० लाखाची गुंतवणुक करण्यात आली. त्यात शेडचे बांधकाम, कच्चा माल पुरवठा, माल तयार करणे, मशिन खर्च आदीवर खर्च करण्यात येत आहे. अगरबत्ती प्रकल्पातून पळसगाव येथील २२ महिलांना नियमीत रोजगार मिळत आहे. त्यातून प्रत्येक महिलांना रोज आठ ते दहा तास काम केल्यानंतर १५० ते २०० रुपये मजुरी मिळत आहे. यातून महिलाचा आर्थिक स्तर उंचावत आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंद निर्माण झाला आहे. यावेळी प्रतिनिधीने वनपरिक्षेत्र अधिकारी व्ही. एम. मुरकुटे यांच्याशी संपर्क केला असता, सदर प्रकल्पातून महिलांना रोजगार मिळाला आहे. त्यामुळे महिलांना समाधान लाभले आहे. तसेच भविष्यात पुन्हा जास्तीत जास्त महिलांना रोजगार देण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे सांगितले. यासाठी इको डेव्हलपमेंट समितीचे अध्यक्ष प्रभाकर गजबिये, वनपाला लोखंडे सहकार्य करीत असल्याचे सागितले. तसेच सदर प्रकल्प पूर्णत्वास आणण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी वी. एस. मुरकुटे, वनपाल मु. व्ही. लोखंडे, जनवन विकास अधिकारी प्रभाकर गजभिये यांच्या प्रयत्नातून साकार करण्यात आला असल्याची माहिती दिली.