शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

दोन वर्षांनंतर १ हजार २०० शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा किलबिलाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2021 05:00 IST

जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्ग सुरू करण्यात आले. राज्य शासनाने सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी देताना कोरोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत सुरुवातीला स्वच्छतेचा उपक्रम राबविला. मुलांना वर्गात बसविताना अंतर ठेवण्यात आले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण झाले नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राज्य शासनाने ग्रामीण भागात इयत्ता १ ते ४ आणि शहरी भागात इयत्ता १ ते ७ वीपर्यंतच्या शाळांना परवागनी दिल्याने जिल्ह्यात आज सुमारे १२०० शाळांचे वर्ग सुरू झाले. दोन वर्षांपासून घरीच राहिलेले विद्यार्थी प्रथमच शाळेत आल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. शिक्षकांनी मुलांचे स्वागत करून कोरोनापासून कसे सुरक्षित राहावे, याबाबत सूचना केल्या. मात्र, चंद्रपूरसह तालुकास्थळावरील बहुतांश इंग्रजी कॉन्व्हेट शाळांनी अद्याप वर्ग सुरू केले नाही. महानगरपालिका शाळांतही अशीच स्थिती दिसून आली.जिल्हा परिषद शाळांतील सर्व वर्ग सुरू करण्यात आले. राज्य शासनाने सर्व वर्ग सुरू करण्यास मंजुरी देताना कोरोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली होती. त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेत सुरुवातीला स्वच्छतेचा उपक्रम राबविला. मुलांना वर्गात बसविताना अंतर ठेवण्यात आले. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घ्यावे. लसीकरण झाले नाही. या कारणास्तव अनुपस्थित राहता येणार नाही, अशा सूचना असल्याने शिक्षकांची आज १०० टक्के उपस्थिती होती. ग्रामीण भागात पहिली ते चौथी व शहरी भागात पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिक्षकांनी पालकांच्या भेटी घेऊन संवाद साधला.

असा गेला शाळेचा पहिला दिवसमुलांच्या प्रकृतीची चौकशी करण्यात आली. कुटुंबात कुणी आजारी आहेत, याबाबतही शिक्षकांनी विचारणा केली. वर्गात आल्यानंतर सर्वांना सॅनिटायझर वाटप करण्यात आले. पहिली तासिका आरोग्य व स्वच्छतेवर घेण्यात आली. वर्गात अंतर ठेवून बसविण्यात आले. मागे पडलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सूचना असल्याने शिक्षकांनी नियोजनानुसार पहिल्या दिवशी अध्यापन केले. मुलांनी आज जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात मनसोक्त खेळल्याचे दिसून आले. मनपा शाळा आज बंद होत्या. 

इंग्रजी शाळांना प्रशासनाच्या  परवानगीची प्रतीक्षाचंद्रपूर व तालुकास्थळावरील खासगी इंग्रजी शाळांनी १ ते ४ वर्ग अजूनही सुरू केले. काही इंग्रजी शाळांनी आज पालकांची ऑनलाइन सभा घेऊन शाळा सुरू करण्याबाबत मते जाणून घेतली.  प्रशासनाकडून परवानगी घेतल्यानंतर अंतिम निर्णय ठरणार आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या