शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

सात तासांची अथक मेहनत आणि दोन तास रस्ता बंद करून अखेर नरभक्षक वाघ जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2021 22:23 IST

Chandrapur News चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या काही काळापासून विविध ठिकाणाच्या तीन नागरिकांना ठार केलेल्या नरभक्षी वाघाला अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

ठळक मुद्देपाेभुर्णा परिसरात सात तासांचे रेस्क्यू ऑपरेशन

चंद्रपूर : पोंभुर्णा तालुक्यात गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी तीन जणांना वाघाने ठार केले. रोजच वाघाचे कुठे ना कुठे दर्शन होत आहे. यामुळे पोंभुर्णा परिसरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच गुरुवारी दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास वाघाने एका बकरीची शिकार केली. याची माहिती गावकऱ्यांना होताच त्या वाघाला पळवून लावण्यासाठी गावकरी एकवटले आणि वाघाला पळवून लावले. मात्र, वाघ एका पुलाखाली शिरला. पुलाचा पुढील भाग बंद असल्याने तो तिथेच अडकला. ही संधी साधत वनविभागाने या वाघाला पिंजऱ्यात जेरबंद केले. त्यामुळे वाघाच्या दहशतील असलेल्या पाेंभुर्णा तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.

वाघाबाबतची माहिती पोंभुर्णा वनविभागाला मिळताच त्यांचा चमू घटनास्थळी दाखल झाला आणि पाईपमधील जाणारा रस्ता बंद करण्यात आला. वाघ पुलामध्ये असल्याची माहिती तालुक्यात वाऱ्यासारखी पसरली आणि वाघाला बघण्यासाठी लोकांची तोबा गर्दी झाली. वाघाची सुटका करण्यासाठी वनविभागाने शर्थीचे प्रयत्न केले. पण वाघाला जेरबंद करा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यानंतर वाघाला जेरबंद करण्यासाठी रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. तब्बल सात तासानंतर वाघाला पकडण्यात यश आले.

दोन तास ठेवावा लागला रस्ता बंद

रेस्क्यू टीम वाघाला जेरबंद करत असताना दोन्ही बाजूने रस्ता बंद ठेवण्यात आला होता. यावेळी सर्व वाहने जिथल्या तिथे थांबली होती. तब्बल दोन तास हा रस्ता बंद ठेवण्यात आला होता.

तिघांचा बळी, तर पंधरापेक्षा अधिक नागरिक जखमी

यावर्षी मार्चमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्याला वाघाने ठार केले होते. मागच्याच महिन्यात कसरगट्टा येथील कापूस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला कवीटबोळी शिवारात वाघाने ठार केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच वेळवा येथे फिरायला गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला चढवून ठार केले. वाघाच्या हल्ल्यात तिघांचा बळी गेला. शिवाय पंधरापेक्षा अधिक नागरिक जखमी झाले. यामुळे पोंभुर्णा वनपरिक्षेत्रातील परिसरात भीतीचे वातावरण पसरले. अखेर हा वाघ जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

टॅग्स :Tigerवाघ