शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

रोवणीनंतरचा तो संस्कार आजही कायम

By admin | Updated: August 18, 2015 01:05 IST

अनेक प्रथा परंपरा काळाच्या ओघात गडप झाल्या. पण या भागात धान रोवणीनंतर जो संस्कार केल्या तो काळाच्या कसोटीवर

घनश्याम नवघडे ल्ल नागभीडअनेक प्रथा परंपरा काळाच्या ओघात गडप झाल्या. पण या भागात धान रोवणीनंतर जो संस्कार केल्या तो काळाच्या कसोटीवर खऱ्या अर्थाने उतरला असून तो संस्कार आजही पुर्ण केल्या जात आहे.पुर्व विदर्भातील चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यात धानाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतल्या जाते. हे पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना अनेक दिव्य पार पाडावी लागत असली तरी शेतकरी अतिशय श्रद्धेने ते पार पाडत असतो. याचा शेवट, गोड आनंदात आणि समाधान पुर्ण वातावरणात व्हावा, या हेतुनेच या संस्काराची प्रथा पडली असावी असे बोलल्या जाते.ज्या शेतकऱ्यांचे ज्या दिवशी रोवणे संपत,े त्या दिवशी रोवणी संपलेल्या बांधीतून डब्यांमध्ये चिखल घेतल्या जाते. डब्यामध्ये घेतलेले चिखल रोवणी करणाऱ्या महिलांकडून शेतमालकांच्या अंगावर उडविल्या जाते. तास अर्धातास हा खेळ चालल्यानंतर रोवणी करणाऱ्या शेतमालकाच्या घरी येतात. त्यानंतर अंगणात पाट ठेवण्यात येतो. महिलांकडून शेतमालकाचे पाय धुण्यात आल्यानंतर ओवाळणी करण्यात येते. यावेळी शेतमालक भेट म्हणून काही रक्कम देत असतात.यानंतर शेतातून आणलेल्या चिखलाने शेतमालकाच्या घराच्या भिंतीवर नांगर, फण, धान्य ठेवण्याचे ढोले यांचे चित्र काढण्यात येते. रोवणी करणाऱ्या महिलांकडून अक्षता लावून या चित्रांचेही पूजन केल्या जाते. पूजनाचा हा कार्यक्रम पार पडल्यानंतर शेतकरी रोवणी करणाऱ्या महिलांना आपल्या ऐपतीप्रमाणे नास्ता किंवा जेवणाचा कार्यक्रम ठेवित असतो.धानपट्टयात कमी अधिक प्रमाणात या प्रथेचे आजही पालन केल्या जात आहे. अनेक परंपरा, संस्कार काळाच्या उदरात गडप झाले. मात्र ही परंपरा आजही ग्रामीण भागात कायम आहे.