शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

३० नोव्हेंबरच्या खाण अपघातानंतर चंद्रपुरातील १६ लाख टन कोळसा मातीच्या ढिगाऱ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2017 11:26 IST

माजरी वेकोलि क्षेत्रातील जुना कुनाडा कोळसा खाणीत ३० नोव्हेंबरला रात्री दीड वाजता मातीचा ढिगारा कोसळल्याची घटना घडली होती. या खाणीतील मातीच्या ढिगाऱ्यात सुमारे १६ लाख टन कोळसा दबून असल्याची माहिती पुढे आली आहे.

ठळक मुद्देअनेक मशिन्स अद्यापी ढिगाऱ्याखालीचखाण बंद ठेवण्याचे आदेश

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : माजरी वेकोलि क्षेत्रातील जुना कुनाडा कोळसा खाणीत ३० नोव्हेंबरला रात्री दीड वाजता मातीचा ढिगारा कोसळल्याची घटना घडली होती. या खाणीतील मातीच्या ढिगाऱ्यात सुमारे १६ लाख टन कोळसा दबून असल्याची माहिती पुढे आली आहे.जुना कोनाडा खाणीतून कोळसा उत्खनन करण्याचे कंत्राट धनसार इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनीकडे आहे. उत्खननाचे काम सुरू असताना महाकाय मातीचा ढिगारा कोसळल्याने सहा कामगार गंभीर जखमी झाले होते. या खाणीत वॉल्वो टिप्पर, डोजर, पी. सी. मशिन, ड्रिल मशिन, सर्व्हिस वाहन व इतर मशिन अजुनही दबून आहेत. याप्रकरणी कोल इंडियाने कुणावरही कार्यवाही केली नाही. त्यामुळे वेकोलि सुरक्षा समितीचे संचालक व कोल इंडिया अधिकाऱ्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. सुरक्षा समितीचे संचालक मंडळ, वेकोलि अधिकाऱ्याच्या विशेष पथकाने खाणीची वारंवार पाहणी केली. मात्र, मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या मशिन बाहेर कशा काढायच्या, हा प्रश्न पुढे आल्याने वेकोलिच्या वरिष्ठांनी खाण बंद ठेवण्याचे आदेश दिले. यासंदर्भात ‘लोकमत’ ला माहिती देताना माजरी वेकोलिचे महाप्रबंधक एम. येलय्या म्हणाले, लवकरच जुना कुनाडा कोळसा खाण सुरू होईल. डि.जी.एम.एस. यांची परवानगी मिळताच धनसार इंजिनिअरिंग प्रायव्हेट कंपनीच्या वतीने मागच्या दिशेने नवीन बेंचेस तयार करण्याचे नियोजन करण्यात येईल. ढिगाऱ्याखाली दबलेल्या मशिन काढण्यासाठी तीन ते चार महिने लागतील. सुरक्षतेचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर कोळसा उत्पादन सुरू करू, असेही येलय्या यांनी सांगितले.नुकसान भरपाई देण्याची वेकोलिवर पाळीखाणीतून दररोज पाच हजार टन कोळसा व ३२ हजार टन माती काढण्याचे काम सुरू होते. वेकोलिने धनसार कंपनीला तीन वर्षांचे कंत्राट दिले असून, ३२ लाख टन कोळसा उत्पादन खाणीतून करायचे आहे. करारानुसार धनसार कंपनीचे १८ महिन्यांचे काम शिल्लक आहे. कंपनीने उर्वरीत कोळसा काढण्यास नकार दिल्यास नुकसान भरपाई देण्याची पाळी वेकोलिवर येणार असल्याचे बोलले जात आहे.

टॅग्स :Accidentअपघात