शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

-तर मुस्लिमांतर्फे मुख्यमंत्र्यांचा सत्कार करणार

By admin | Updated: October 26, 2016 01:20 IST

२०१४ मध्ये आघाडी सरकारने संवैधानिक अधिकाराअंतर्गत मुस्लम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाला युती सरकारने पुन: बहाल करण्याचा निर्णय घ्यावा.

नवाब मलिक : राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समितीचे आयोजनचंद्रपूर : २०१४ मध्ये आघाडी सरकारने संवैधानिक अधिकाराअंतर्गत मुस्लम समाजाला दिलेल्या पाच टक्के आरक्षणाला युती सरकारने पुन: बहाल करण्याचा निर्णय घ्यावा. त्यापोटी पाच लाख मुस्लीम समाज बांधवासोबत मुख्यमंत्र्यांचा हार्दिक सत्कार करुन स्वागत केल्या जाईल, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले.स्थानिक नेहरु विद्यालय प्रांगणात राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती (महाराष्ट्र) घेतलेल्या विदर्भस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली. यावेळी मलिक बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी सय्यद अनवर अली यांनी मुस्लिम समाजाला आरक्षण मिळेपर्यंत राष्ट्रीय मुस्लिम हक्क संघर्ष समिती हा लढा शेवटपर्यंत लढत राहील, असा निर्धार व्यक्त केला.विशेष अतिथी आ.बच्चू कडू यांनी मुस्लिम समाजाला शिक्षण घेवून संवैधानिक अधिकाराच्या लढ्यात व स्वच्छ राजकारणात आपले योगदान देण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय मुस्लिम बहुजन परिषदेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. जावेद शेख यांनी मुस्लिम समाजाची वस्तुस्थिती मांडताना आणि १९४७ ते २०१६ पर्यंत समाजाची परिस्थिती किती हलाखीची झाली. त्यात राष्ट्रीय भूमिका कशी परिणामकारक होती, याचे विस्तृत विवेचन केले. नाशिकचे मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे अध्यक्ष अजिजखान पठाण यांनी मागील ६० वर्षांमध्ये धर्मनिरपेक्ष पक्षांनी मुस्लिम समाजाचा वापर केवळ मतांकरिता केल्याचा आरोप केला. धर्माच्या नावावर आरक्षण देता येत नाही म्हणणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेत आमचा धर्म इस्लाम आहे आणि इस्लामला माणणारा समाज मुस्लिम आहे, हे स्पष्ट करीत मुस्लिमांचा धर्म इस्मा आहे. त्याची न्यायालयीन लढाई लढत असल्याचे त्यांनी नमूद केले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून आ. नाना शमकुळे व आ. बाळू धानोरकर यांनी संपूर्ण समाजांना त्यांचा संवैधानिक अधिकार मिळण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. या परिषदेमध्ये आरक्षणसंबंधी ठराव घेऊन मुख्यमंत्री आणि उपस्थित राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निवेदन पाठविण्यात आले. परिषदेत समितीचे महासचिव फिरोजखान पठाण यांनी आपले मत व्यक्त केले. प्रास्ताविक अ‍ॅड. रफिक शेख यांनी केले. संचालन नईमखान आणि आभार मुख्य संघटक मुश्ताक कुरेशी यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता केंद्रीय उपाध्यक्ष जाकीर शेख, सचिव शाहिद कुरेशी, जिल्हा प्रभारी अश्फाक शेख, केंद्रीय सदस्य अकबर शेख, मजहर अली, शरीफ शेख, मेहमूद शेख, जैनुल आबेदिन, गयास सरफराज मेमन, शहर अध्यक्ष समीज शेख, यांनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)