लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील धरणातील पाणी आटू लागले आहे. मागील वर्षी धरणांमधील जलसाठ्याच्या दशलक्ष घनमीटरच्या तुलनेत सुमारे २० ते २५ टक्के पाणी आटले. त्यामुळे मार्चनंतर पाणी टंचाईच्या झळा बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.रब्बी पिकांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. यंदा जिल्ह्यात मागील वर्षाच्या तुलनेत अल्प पाऊस पडला. परिणामी, धरणांतील पाण्याची पातळी कमालीची घटली. मागील महिन्यात जिल्ह्यातील लहान ३ धरणांमध्ये बऱ्यापैकी जलसाठा उपलब्ध होता. परंतु, दिवसेंदिवस ही धरणे तळ गाठत आहेत. धरणातून पुरेसे पाणी मिळत असल्याने रब्बी पिके धोक्यात आली. धरणांनी तळ गाठल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी शेतीसाठी पाणी सोडण्याच्या वेळात कपात केल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सद्यस्थितीत केवळ २२.०९ टक्के साठा असल्याने मार्चनंतर मोठे संकट उभे ठाकणार आहे.
मार्चनंतर बसणार पाणीटंचाईच्या झळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 22:18 IST
जिल्ह्यातील धरणातील पाणी आटू लागले आहे. मागील वर्षी धरणांमधील जलसाठ्याच्या दशलक्ष घनमीटरच्या तुलनेत सुमारे २० ते २५ टक्के पाणी आटले. त्यामुळे मार्चनंतर पाणी टंचाईच्या झळा बसण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
मार्चनंतर बसणार पाणीटंचाईच्या झळा
ठळक मुद्देधरणांनी गाठला तळ : रब्बी पिके धोक्यात