गावकऱ्यांत आनंद : अखेर प्रशासनाने दखल घेतलीपाटण : जिवती तालुक्यातील जनकापूर येथे पाणी पेटले आहे. ‘पाणी टंचाईमुळे महिलांनी धरली माहेरची वाट’ या मथळ्याखाली लोकमतने बातमी प्रकाशित केली. याची दखल घेत जिल्हा प्रशासन व तालुका प्रशासनचे जिवती तालुक्यातील पाटण ग्राम पंचायत अंतर्गत येत असणाऱ्या जनकापूर येथे अखेर पाण्याचे टँकर पोहचले. यामुळे येथील नागरिकात आनंदाचे वातावरण पसरले. गाावात दोन विहीरी आहेत. यातील एकच पिण्याच्या पाण्याची आहे. या दोन्ही विहिरींनी तळ गाठल्याने नागरिकांना एक मैलवरील पाटण येथून भर उन्हात पाणी आणावे लागत होते. यामुळे त्रस्त झालेल्या वच्छला पवार, शोभा जाधव, अनसुया पवार या विवाहित महिलांनी आपले माहेर गाठले होते. (वार्ताहर)लोकमतने आमच्या गावातील पाण्याची समस्याची दखल घेत आमची व्यथा मांडली. त्यामुळे आता गावात दिवसातून तीन वेळा टँकरने पाणी मिळू लागले आहे.- भीमराव पवार, उपसरपंच, पाटणआमच्या गावात पाण्यासाठी हाहाकार माजला होता. पत्रव्यवहार करुनही कोणतेच अधिकारी व नेते गावात यायला तयार नव्हते. कुणाचेही लक्ष नव्हते. परंतु लोकमतने आमची व्यथा शासनापर्यंत पोहचवली व आमचा टँकरचा प्रश्न सुटला.- लक्ष्मीबाई रासोटकर, पाटण
अखेर जनकापूरवासीयांना मिळाले पाण्याचे टँकर
By admin | Updated: April 27, 2016 00:59 IST