शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाची ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
2
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
3
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
4
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
5
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
6
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
7
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
8
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
9
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
10
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
11
बापरे बाप! बंजी जंपिंग करताना आला हार्ट अटॅक, हवेतच मुलीचा मृत्यू? Video पाहून भरेल धडकी
12
WTC Final Scenario : टीम इंडियाचं गणित पुन्हा बिघडणार? फायनल खेळण्यासाठी जिंकावे लागतील एवढे सामने
13
नवऱ्यासोबत घटस्फोटाच्या चर्चा, सततच्या ट्रोलिंगवर भडकली ऐश्वर्या; म्हणाली, "साखरपुड्यापासूनच..."
14
Hyundai Creta चं टेन्शन वाढणार, येतायेत दोन 'धाकड' SUV; जाणून घ्या फीचर्स, काय असेल खास?
15
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
16
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
17
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
18
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
19
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
20
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना १२ वर्षानंतरही तहानलेलीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2019 21:43 IST

२००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देपाण्याची टाकी बनली शोभेची वास्तू : पळसगावात पाणी टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कपळसगाव : २००५-०६ मध्ये पळसगाव येथे जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत पाणी पुरवठा नळ योजनेची टाकी बांधण्यात आली. मात्र बांधकाम अर्ध्यावरच रखडल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे.पळसगाव हे बल्लारपूर येथून १५ कि.मी. अंतरावर आहे. तेरा वर्षापूर्वी शासनाने लाखो रुपये खर्च करून नळ योजनेची टाकी बांधली. मात्र नळ वितरण प्रणालीला अल्पावधितच ग्रहण लागल्याने संबंधित काम पूर्णत्वास गेले नाही. प्रारंभी नळ योजनेचे काम धडाक्यात सुरू झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या. घरापर्यंत पाणी पोहचेल, असेही अनेकांना वाटले, पण त्यांचा आनंद काही दिवसातच मावळला. पाणी घरापर्यंत येऊ शकले नाही. त्यामुळे अद्याप पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. जलस्वराज्य प्रकल्पाचे काम अर्ध्यावरच थांबल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे. पूर्वी पळसगावात नळाद्वारे पाणी वितरण केल्या जात होते. परंतु टाकी जीर्नवस्था झाल्याने ती बंद करण्यात आली. त्यानंतर पळसगावात टप्याटप्याने सरकारी दहा बोअरवेल मारण्यात आल्या. परंतु त्या एकाही बोरवेलचे पाणी पिण्यायोग्य नाही. केवळ एकमेव बोरिंगचे पाणी हे पिण्यायोग्य आहे. त्यामुळे त्या एकाच बोरींगवर महिलांची गर्दी असते. अनेकवेळा महिलांमध्ये भांडण सुद्धा होत आहे. कधी या बोरिंगला बिघाड आला, तर पुन्हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर होतो. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष व्यक्त केल्या जात आहे.पाण्यासाठी भटकंतीगावातील जुनी पाण्याची टाकी पाळून नव्याने बांधण्यात आली. मात्र योजना मागील १३ वर्षांपासून पुर्णत्वास गेली नाही. परिणामी नागरिकांना पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी अनेकवेळा प्रशासनाकडे पाठपुरावाही केला आहे. मात्र काहीही उपयोग झाला नाही. आता गावात पाण्यासाठी भटकण्याची वेळ आली आहे. प्रशासनातर्फे बोअरवेल लावण्यात आल्या. मात्र पाणी पिण्यायोग्य नसल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्नही गंभीर होत आहे.