शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
2
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
3
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
4
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
5
Operation Sindoor Live Updates: आम्हाला दहशतवाद संपवायचाय, तुम्ही धाडस करा, कपिल सिब्बल यांचा मोदींवर निशाणा
6
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
7
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
8
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
10
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
11
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
12
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
13
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
14
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
15
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
16
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
17
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
18
बावनकुळेंनी गरीब महिलेला ई-रिक्षा देऊन तिच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली
19
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
20
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?

नागभीड नगर परिषदेसाठी वकील डॉक्टर, प्राध्यापक इच्छुक

By admin | Updated: March 12, 2017 01:35 IST

नागभीड नगरपरिषदेचा राजकीय आखाडा तापायला सुरुवात झाली आहे. या आखाड्यात नागभीड येथील वकील,

जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न : राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू घनश्याम नवघडे   नागभीड नागभीड नगरपरिषदेचा राजकीय आखाडा तापायला सुरुवात झाली आहे. या आखाड्यात नागभीड येथील वकील, डॉक्टर, प्राध्यापकांसोबतच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज रिंगणात उतरत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. नागभीड नगरपरिषदेची ही पहिलीची निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येकालाच नवलाई आहे. मिळालेल्या संकेताप्रमाणे या नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १ मधून काँग्रेसचे जेष्ठ नेते पंजाबराव गावंडे यांचे चिरंजीव व नागभीड पं.स.चे माजी उपसभापती दिनेश गावंडे यांनी लढण्याची तयारी चालविली आहे. भाजप येथून कोणाला उमेदवारी देते हे गुलदस्त्यात असले तरी डोंगरगावचे रामदास हेमणे येथून दावा करू शकतात. येथील दुसरे पद अनु.जातीच्या महिलेकरिता आरक्षित आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना शोधमोहीम राबवावी लागणार आहे. बोथली-चिखलपरसोडी व पंचायत समिती कृषीनगर भाग मिळून तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्र. २ मधून काँग्रेसकडून चिखलपरसोडीचे माजी सरपंच पुरुषोत्तम राऊत, दीपक ब्राम्हणकर यांनी दावा केला आहे. भाजपकडून चिखलपरसोडीचे माजी उपसरपंच गौतम राऊत, सुलेझरीचे माजी सरपंच सचिन आकुलकर यांच्या नावाची येथे चर्चा आहे. चिखलपरसोडीचे माजी उपसरपंच दिनकर संदोकर यांनी येथून अपक्ष लढण्याची तयारी केली आहे. जुन्या नवखळा वस्तीचा समावेश असलेल्या प्रभाग क्र. ३ मधून काँग्रेसकडून निवृत्त प्राचार्य बारेकर इच्छुक आहेत. भाजपाकडून येथे दिलीप चौधरी उमेदवार बनू शकतात. महिला प्रवर्गातून येथून दोन्ही पक्ष कोणास मैदानात उतरवतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रभाग क्र. ४ मधून शिरिष वानखेडे यांनी काँग्रेसकडून काम सुरू केले आहे. येथील दुसरे पद अनु.जमाती महिलाकरिता राखीव आहे. पुष्पा चौखे किंवा धारणे येथून काँग्रेसच्या उमेदवार होऊ शकतात. भाजपकडून येथून अ‍ॅड. रविंद्र चौधरी यांनी होर्डिंग्ज बॅनरच्या माध्यमातून संपर्कास सुरुवात केली आहे. याशिवाय मनोज कोहाड, राजेश मेश्राम यांच्या नावाचीही चर्चा ऐकायला मिळत आहे. नागभीडचे नगराध्यक्षपद अनु.जमातीकरिता आरक्षित आहे. असे असले तरी केवळ माना जातीच्या उमेदवारांवर काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षाचे विचारमंथन सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून प्रा.डॉ. उमाजी हिरे, नाना चौखे, विलास श्रीरामे यांनी पोस्टर-बॅनरद्वारे प्रचारास प्रारंभ केला आहे. काँग्रेसकडून विनायक रंघये, विनायक चौखे, प्रमोद जुमनाके यांची नावे घेतली जात आहेत. नागभीड नगर परिषदेची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवर काही आक्षेप किंवा हरकती असतील तर १६ मार्चपर्यंत त्या दाखल कराव्यात, असे प्रशासनाने म्हटले आहे. नागपूरला दोन टर्म नगरसेवक राहिलेले प्राचार्य योगेश गोन्नाडे यांनी स्वत: नगराध्यक्ष म्हणून तिसऱ्या आघाडीमार्फत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागातून उमेदवार तेसुद्धा देणार आहेत. त्यामुळे काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारी न मिळालेले इच्छुक तिसऱ्या आघाडीकडून रिंगणात उतरू शकतात.