शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे प्रशासक हटणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2022 05:00 IST

कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोना ओसरल्यामुळे क व ड वर्गातील संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. मात्र, आता मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकाही घेतल्या जात आहेत. सोसायट्यांच्या संचालक मंडळाची निवड होऊन संचालक मंडळ तयार झाले. त्यामुळे सहकार विभागाने आता बाजार समित्यांसाठी ठराव घेण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाने आदेश दिले आहेत.

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील सेवा संस्थांच्या निवडणूक रणधुमाळीने ग्रामीण क्षेत्रात सध्या माहोल आहे. काही सेवा संस्थांचे निकालही जाहीर झाले. अशा संस्था आणि ग्रामपंचायतींना तातडीने मतदार यादी पाठविण्याचा सहकार निवडणूक प्राधिकरणाचा आदेश शुक्रवारी धडकला. त्यामुळे मुदत संपलेल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांचीही आता लगीनघाई सुरू होणार आहे.  कोरोनामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोना ओसरल्यामुळे क व ड वर्गातील संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या. मात्र, आता मोठ्या सहकारी संस्थांच्या निवडणुकाही घेतल्या जात आहेत. सोसायट्यांच्या संचालक मंडळाची निवड होऊन संचालक मंडळ तयार झाले. त्यामुळे सहकार विभागाने आता बाजार समित्यांसाठी ठराव घेण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाने आदेश दिले आहेत. ज्या सोसायट्यांच्या निवडणुका झाल्या त्यांना बाजारसमितीच्या निवडणुकीसाठी ठराव घेण्याचे आदेश दिले. त्यामुळे बाजार समित्यांमध्ये हालचाली वाढल्या आहेत.

मतदानाचा अधिकारकृषी उत्पन्न बाजार समितीसाठी ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटी संचालक हे मतदार असतात. त्यासाठी संबंधित तालुक्यातील सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्यांची यादी पाठविण्याचा आदेश सहकार निवडणूक प्राधिकरणाने दिला आहे.

अशी तयार होईल मतदार यादीसोसायटीचे संचालक व ग्रामपंचायत सदस्यांची यादी ही संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती सचिवाकडे पाठविली जाते. यादीच्या तपासणीनंतर सहाय्यक निबंधकाकडे ती पाठविली जाते.  

१२ बाजार समित्यांवर प्रशासकचंद्रपूर जिल्ह्यात मार्च २०२२ पर्यंत १२ बाजार समित्यांची मुदत संपली. या बाजार समितीच्या निवडणुका रद्द करण्याचा निर्णय राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने घेतला होता. या बाजार समित्यांची निवडणूक होणार आहे. 

सोयायटीची निवडणूक अंतिम टप्प्यात ३४ सेवा सहकारी संस्थांची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. उर्वरित ३१७ सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित केला जाऊ शकतो.

निवडणुकीस पात्र बाजार समित्याचंद्रपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, मूल, नागभीड, सिंदेवाही, ब्रह्मपुरी, पोंभुर्णा, चिमूर, गोंडपिपरी, कोरपना बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे.

अशी आहे पार्श्वभूमीनिवडणुका घेण्याबाबत ६ व २१ ऑक्टोबर २०२१ रोजी आदेश काढले होते. मात्र, प्रारूप यादीवर काहींनी आक्षेप दाखल केला. हे प्रकरण उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात गेले. अखेर न्यायालयाच्या आदेशानुसार प्राधिकरणाने दोनही आदेश रद्द केले.

 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रElectionनिवडणूक