शहरं
Join us  
Trending Stories
1
Sindhudurg: शिरोडा वेळागर समुद्रात आठ पर्यटक बेपत्ता, तिघांचे मृतदेह सापडले
2
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
3
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
4
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
5
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
6
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
7
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
8
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
9
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
12
बेडरूममध्ये कॅमेरा बसवून खासगी व्हिडीओ काढले अन् परदेशात...; पत्नीने समोर आलं पतीचे किळसवाणं कृत्य
13
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
14
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
15
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
16
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
17
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
18
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
19
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
20
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...

‘त्या’ 75 ग्रामपंचायतींवर आठवडाभरात प्रशासक राज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 05:00 IST

कोरोना परिस्थिती नियंत्रणात नाही. रुग्णसंख्या घटल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शिथिलता देऊन  काही निर्बंध कायम आहेत. मात्र, कोरोनाचे अद्याप संकट टळलेले नाही. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.   मदान यांनी धुळे, नंदुरबार, नागपूर, वाशिम व अकोला जिपच्या ८५ आणि पंसच्या १४४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. कोरोनामुळे  निवडणुका रद्द झाल्या आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे राजकारण लॉक : निवडणुकीची शक्यताच मावळली

राजेश मडावीलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : राजुरा, कोरपना व जिवती तालुक्यांतील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत येत्या २१ जुलैला संपणार आहे. कोविड महामारीमुळे सार्वत्रिक निवडणुका घेण्याची शक्यताच नाही. त्यामुळे मुदत संपलेल्या  ग्रामपंचायतींवर पुढील आठवड्यापासून प्रशासक नियुक्तीचा आदेश जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी १२ जुलै २०२१ रोजी जारी केला. या निर्णयामुळे निवडणुका लढविण्यासाठी बाशिंग बांधून तयार असणाऱ्या इच्छुकांचा मात्र हिरमोड झाल्याची चर्चा आहे. कोरोना परिस्थिती नियंत्रणात नाही. रुग्णसंख्या घटल्याने चंद्रपूर जिल्ह्यात शिथिलता देऊन  काही निर्बंध कायम आहेत. मात्र, कोरोनाचे अद्याप संकट टळलेले नाही. राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस.   मदान यांनी धुळे, नंदुरबार, नागपूर, वाशिम व अकोला जिपच्या ८५ आणि पंसच्या १४४ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. कोरोनामुळे  निवडणुका रद्द झाल्या आहेत.

प्रशासकांना सरपंचाचे अधिकार प्रशासकपदी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीने इतरत्र पदस्थापना झाली असेल त्याठिकाणी त्यांच्या जागेवर बदलीने येणाऱ्यांनी प्रशासक म्हणून आपोआप नेमणूक झाल्याचे गृहीत धरण्यात येईल. रुजू झाल्यानंतर विनाविलंब तसा अहवाल जि.प.ला सादर करावा लागणार आहे. नियुक्त प्रशासकांना निवडणुका होईपर्यंत सरपंचाचे सर्व अधिकार लागू आहेत.

 तालुकानिहाय ७५ ग्रामपंचायती- कोरपना : बेलगाव, बिबी, चनई, धानोली, दुर्गाडी, जेवरा, कन्हाळगाव, कातलाबोडी, खैरगाव, खिर्डी, कोठोडा बू. लखमापूर, मांडवा, मांगलहिरा, नांदा, पारडी, परसोडा, पिंपळगाव, पिपर्डा, रूपापेठ, सावलहिरा, सोनुर्ली, थुट्रा, उपरवाही, वडगाव, वनसडी - जिवती : आंबेझरी, आसापूर, केकेझरी, कोदेपूर, खडकी रायपूर, खडकी हि. गुडशेला, चिखली बू. चिखली खू. टेकामांडवा, दमपूरमौदा, धोंडा अ. नोकेवाडा, पाटण, पुनागुडा, भोक्सापूर, मरकलमेटा, मरकागोंदी, येल्लापूर, राहपल्ली, खू. शेनगाव - राजुरा : अहेरी, अंतरगाव, भेंडाळा, भेदोडा, भुरकुंडा बू. भुरकुंडा खू. ईसापूर, जामनी, कवाडगोंदी, कोष्टाळा, लक्कडकोट, मंगी बू. मानोली बू. मानोली खू. नोकारी खू. पाचगाव, पांढरपौनी, साखरी, साखरवाही, शिर्शी, सोनापूर, सोंडो, सोनुली, सुब्बई, टेंभुरवाही, वरूर रोड, येरगव्हाण,

राजुरा, जिवती व कोरपना तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यकारिणीची मुदत २१ ते २५ जुलै २०२१ दरम्यान संपणार आहे. या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्तीचा आदेश जारी झाला. नियुक्त प्रशासकांनी संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार हाती घेऊन तसा अहवाल पंचायत समितीला सादर करावा लागणार आहे.-कपिल कलोडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. चंद्रपूर

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत