शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

धबधबे व डोंगरकड्यांवर पर्यटनाला प्रशासनाची मनाई; नागरिकांसाठी प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 12:03 IST

Chandrapur : धबधबे व पर्यटन स्थळे बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यातील नदी, तलाव, धरणे, धबधबे, गडकिल्ले, जंगल, आदी ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात. मान्सून कालावधीत अनुचित घटना घडू नये, जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी सुरक्षेसाठी धबधबे व पर्यटन स्थळे बंद करण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष विनय गौडा जी.सी. यांनी बुधवारी (दि. २१) जारी केला. ही पर्यटन स्थळे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित झाली आहेत.

पर्यटन हा जिल्ह्याच्या विकासाचा एक महत्त्वाचा घटक आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढीचा प्रयत्न करीत असताना 'सुरक्षित व जबाबदार पर्यटक' हे सूत्र अवलंबिणे आवश्यक आहे. पर्यटकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रामुख्याने प्रशासनाची आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धबधबे, तलाव व गड किल्ल्यांवरील प्रेक्षणीय स्थळांना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, वनविभाग, पुरातत्त्व विभाग, शहरी व ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर आवश्यक यंत्रणांनी उपविभागीय अधिकाऱ्यांनी संबंधित स्थळांना भेट देऊन आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहणी करावी. जिल्ह्यातील धबधबे, तलाव, नदी, डोंगरांच्या कड्यावर असलेली प्रेक्षणीय स्थळे या ठिकाणी प्रतिबंधात्मक क्षेत्र निश्चित करून सुरक्षेच्या दृष्टीने काही अंतरावर नियंत्रण रेषा आखावी व त्या नियंत्रण रेषेच्या पुढे पर्यटक जाणार नाही, अशी व्यवस्था करावी. संबंधित यंत्रणांनी क्षेत्र प्रतिबंधात्मक असल्याचे फलक लावण्याच्या सूचना जिल्हाधिकरी विनय गौडा यांनी दिल्या.

उपाययोजनांचा आराखडा

  • बहुतांश पर्यटनाच्या ठिकाणी वाहनांची गर्दी होते, त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, राज्य रस्ते विकास महामंडळ, बांधकाम, जिल्हा परिषद बांधकाम विभागाने अधिनस्त रस्त्यांबाबत सुरक्षेसाठी उपाययोजना करावी. रस्त्याची दुरुस्ती, गतिरोधक, दिशादर्शक, आदींचा समावेश असावा.
  • पर्यटनच्या ठिकाणी कार्यरत असलेले हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी, रिक्षा चालक संघटना, गाईड, स्वयंसेवी संस्था, आदींना विश्वस्त घेऊन स्थानिक पातळीवर उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही बुधवारी जारी करण्यात आल्या.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरtourismपर्यटन