शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

जिल्हा गॅसयुक्त करण्यासाठी प्रशासनाने वाढविली गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 00:25 IST

जिल्ह्याला गॅसयुक्त करून धूरमुक्त करण्याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले शंभर टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. १५ आॅगस्टला चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के गॅस युक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनागरिकांना आवाहन : मागणीसाठी ‘हॅलो चांदा’वर संपर्क साधा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्याला गॅसयुक्त करून धूरमुक्त करण्याकरिता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेले शंभर टक्के गॅस कनेक्शन अभियान पूर्णत्वास येत आहे. १५ आॅगस्टला चंद्रपूर जिल्हा शंभर टक्के गॅस युक्त झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. या कामाकरिता जिल्हा प्रशासनाच्या पुरवठा विभागामार्फत युद्धपातळीवर काम सुरू केले असून कामाची गती वाढविली आहे.ग्राहकांनी गॅस तसेच धान्य मिळवण्यासाठी अर्ज सादर करण्याचे तसेच नवीन गॅस जोडणीकरिता काही अडचणी असल्यास हॅलो चांदाच्या १५५, ३९८ क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाच्या पुरवठा विभागाने पंडित दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियानाची सुरुवात १५ जुलै २०१९ रोजी केली. सदर अभियान १४ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या अभियानाची सुरुवात जिल्ह्यामध्ये केली.या अभियानाद्वारे सर्व पात्र कुटुंबांना शंभर टक्के शिधापत्रिका वाटप करणे, सर्व पात्र शिधापत्रिकांना शंभर टक्के धान्य वाटप, सर्व कुटुंबांना गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.धूरमुक्त जिल्हा संकल्पना राबवण्यासाठी ज्या कुटुंबाकडे गॅस कनेक्शन नाही, त्या कुटुंबातील महिलांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना विस्तारित २ मधून केवायसी फार्म मध्ये १४ निकषांवर आधारित असलेले हमीपत्र भरून द्यायचे आहे. याच सोबत रेशन कार्ड झेरॉक्स, रेशन कार्ड मधील १८ वर्षांवरील व्यक्तींचे आधार कार्डची झेरॉक्स, दोन फोटो, बँक पासबुक झेरॉक्स, लगतच्या गॅस एजन्सीकडे किंवा केरोसीन व रास्तभाव दुकानदाराकडे तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचा आवाहन प्रशासनाने केले आहे.कागदपत्रांची छाननी पूर्ण होताच १०० रुपयात गॅस कनेक्शन मिळणार आहे. ज्यांच्याकडे राशन कार्ड नाही अशांनी तात्काळ तहसील कार्यालयात संपर्क करावा. तसेच ज्यांचे आधार कार्ड नसेल किंवा आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तात्काळ जवळच्या कॉमन सर्विस सेंटर किंवा बँकेत संपर्क साधण्याची विनंतीही करण्यात आली आहे. नागरिकांनी दखल घेऊन या अभियानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागामार्फत करण्यात आले आहे. शिधापत्रिका व गॅस जोडणी संदर्भात मागणी अथवा चौकशीसाठी हॅलो चांदा १५५, ३९८ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा.