शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र शासनाच्या मान्यतेत अडकला हुमन नदी प्रकल्प

By admin | Updated: December 1, 2014 22:50 IST

सिंदेवाही, मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ४६ हजार ११७ हेक्टर शेतीला वरदान ठरणारे सिरकाडा येथील हुमन नदी सिंचन प्रकल्प केंद्र शासनाच्या अंतीम मान्यतेत अडकला आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ ला

भूसंपादनाची कारवाई रखडलीमंगेश भांडेकर - चंद्रपूरसिंदेवाही, मूल, सावली व पोंभुर्णा तालुक्यातील ४६ हजार ११७ हेक्टर शेतीला वरदान ठरणारे सिरकाडा येथील हुमन नदी सिंचन प्रकल्प केंद्र शासनाच्या अंतीम मान्यतेत अडकला आहे. या प्रकल्पाला ३१ मार्च १९८३ ला मंजुरी मिळाली होती. मात्र गेल्या ३० वर्षात या प्रकल्पाचे एकही काम झालेले नसून प्रकल्पाची किमंत आजच्या स्थितीत कितीतरी पटीने वाढली आहे. सिंदेवाही, मूल, सावली व पोंभुर्णा या चार तालुक्यातील १६० गावातील शेतकऱ्यांना वरदान ठरणारे हुमन नदी प्रकल्प सिंदेवाही तालुक्यातील सिरकाडा या गावाजवळ आहे. प्रकल्पाचे सिंचन क्षेत्र ३५ हजार ७५० एवढे असून या प्रकल्पाला १९८२-८३ मध्ये मान्यता मिळाली होती. प्रकल्पासाठी ३३.६८ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर १९८२-८५ च्या काळात उपधरण स्थळाकडे जाण्यासाठी पोचमार्ग तसेच पुरकेपार, नवरगाव व सिंदेवाही येथे स्थायी, अस्थायी स्वरुपाच्या इमारती, विभागीय व उपविभागीय कार्यालयासाठी इमारत इत्यादी कामे करण्यात आली. मात्र, प्रकल्पामुळे वनजमीन बाधीत होत असल्यामुळे वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत वनेत्तर वापराकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण व वने मंत्रालयाची अंतीम मान्यता नसल्यामुळे प्रकल्पाची कामे १९८४-८५ ला बंद करण्यात आली. २४ जून २००९ मध्ये या प्रकल्पाला सुधारीत प्रशासकीय मान्यता मिळाली व १०१६.४९ कोटी रुपयाच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यात आली. यापैकी आॅक्टोबर २०१४ पर्यंत केवळ २१०.८८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. प्रकल्पाच्या बांधकामाकरीता आवश्यक १९२५.५५ हेक्टर वनक्षेत्र वळते करण्यास केंद्र शासनाच्या पर्यावरण व वनमंत्रालयाने २००४ मध्ये मान्यता दिली. मान्यता पत्रातील अटीनुसार वनाचे वर्तमान मुल्य, पर्यायी वनीकरण, पाणलोट क्षेत्र उपचार व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील संरचनेत बळकटीकरण इत्यादी कामांकरीता १८८.४० कोटी रुपये वनविभागाकडे जमा करण्यात आले आहे. मात्र, वनविभागाने पर्यायी वनीकरण व पाणलोट क्षेत्र उपचार कामाकरीता वाढीव दराने येणारी १०४.९७ कोटी रुपये फरकाची रक्कम मागीतली. त्यामुळे ही रक्कम अद्याप भरण्यात आलेली नाही. या प्रकल्पाकरीता ७६५१.४० हेक्टर जमीनीची आवश्यकता असून यात वनजमीन १९२५.५५, राजस्व जमीन ६३६.७४ व खाजगी जमीन ५०८९.११ हेक्टर जमीनीची आवश्यकता आहे. प्राथमिक स्वरुपाच्या कामांकरीता १९८२-८३ मध्ये सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, नवरगाव, अंतरगाव येथील २५.५२ हेक्टर खाजगी जमीन तर गडमौशी येथील १४.९२ हेक्टर राजस्व जमीन संपादीत करण्यात आली. मात्र, या प्रकल्पाची कामेच स्थगीत आहेत. प्रकल्पामुळे बुडीताखालील ३९ गावे बाधीत होणार असून १५ गावे पुर्णत:, ८ गावे अंशत: तसेच १६ गावातील जमीन बाधीत होणार आहे. त्यामुळे १५ गावांचे पुन:र्वसन करावे लागणार आहे. मात्र, राजकीय इच्छाशक्तीचा अभाव व वनविभागाची आडकाठी यामुळे या प्रकल्पाचे काम गेल्या ३० वर्षापासून रखडले आहे. नव्या भाजप सरकारमध्ये जिल्ह्याचे आमदार सुधीर मुनगंटीवार हे राज्याचे वनमंत्री आहेत. तर खासदार हंसराज अहीर हे केंद्रीय खते व रसायन राज्यमंत्री आहेत. त्यामुळे दोन्ही मंत्र्यांची या प्रकल्पाच्या पुर्णत्वासाठी प्रयत्न केल्यास प्रश्न मार्गी लागू शकते. त्यामुळे ४६ हजार हेक्टरला क्षेत्राला सिंचनाची सोय निर्माण होणार आहे.