शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींनी संघर्षदायी इतिहासापासून बोध घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 23:09 IST

आदिवासींनी जल, जंगल व जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. निसर्ग हेच त्यांच्या जगण्याचे प्रमुख साधन असून हे हक्क डावलणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा दिला.

ठळक मुद्देविजया खंडाते : वामनपल्ली येथे गोंडीधर्म संमेलन व समाज प्रबोधन

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : आदिवासींनी जल, जंगल व जमीन सुरक्षित ठेवण्यासाठी प्रचंड संघर्ष केला. निसर्ग हेच त्यांच्या जगण्याचे प्रमुख साधन असून हे हक्क डावलणाऱ्या शक्तींविरुद्ध लढा दिला. हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातूनही दिसून आले. त्यामुळे या इतिहासापासून बोध घ्यावा, असे प्रतिपादन विचारवंत, लेखिका विजया खंडाते यांनी केले. वामनपल्ली येथे वीर बाबुराव शेडमाके गोंड सगामांदी शाखेच्या वतीने रविवारी पार पडलेल्या गोंडी धर्म संमेलन व समाज प्रबोधन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.जि. प. सदस्य गोदरू पाटील जुमनाके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते बाबुराव मडावी यांनी उद्घाटन केले. मंचावर प्रा. धीरज शेडमाके, योगेश कोडापे, निरंजन मेश्राम, राजे विश्वेराव आत्राम, माजी सरपंच सुमन गेडाम, संतोष मेश्राम, ज्ञानेश्वर आत्राम, श्यामराव शेडमाके, वाढीवा, नामदेव किन्नाके व अन्य मान्यवर उपस्थित होते. बाबुराव मडावी यांनीही मार्गदर्शन केले. प्रा. शेडमाके यांनी गोंडवाना व गोंडी धर्म चळवळीची माहिती दिली. संघटनेचे मुख्य संघटक तथा माजी सरपंच साईनाथ कोडापे म्हणाले, आदिवासींनी जीवनाच्या सर्व क्षेत्रात प्रगती करण्यासाठी शिक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी संघटन शक्ती बळकट करावे, असेही सांगितले. संघटनेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विविध सत्रांमध्ये मान्यवरांनी विविध विषयांवर विचार मांडले. रात्री गोंडी ढेमसा नृत्य स्पर्धा पार पडली. संचालन आकाश कडूकर यांनी केले. यावेळी लाठी ठाण्याचे ठाणेदार राठोड, सुमन गेडाम व अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाप्रसंगी युवा कार्यकर्ते सचिन वेलादी, संतोष आत्राम, कुशाल आत्राम, दिलीप कुडमेथे, साईनाथ पेंदोर, जगदिश कुमरे, नरेंद्र वलके व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.नृत्य स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्कारगोंडी ढेमसा नृत्य स्पर्धेत प्रथम पुरस्कार जय जंगो महिला पुरूष मंडळ, द्वितीय जय जंगो ढेमसा मंडळ शिर्शी, तृतीय जय बिरसा मुंडा ढेमसा मंडळ मांडवा, चतुर्थ वीर बिरसा मुंडा ढेमसा मंडळ केळझर आणि पाचवा पुरस्कार सावलहिरा येथील जय गोंडवाना ढेमसा मंडळाला देण्यात आला.