जनजागृतीची गरज : पालकांचा व्यस्त दिनक्रम आणि एकटेपणा कारणीभूतखडसंगी : मागील काही वर्षात व्यसन करणाऱ्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. यामध्ये दुसरी गंभीर बाब म्हणजे कमी वयातच व्यसनाच्या आहारी गेलेल्याची संख्या जास्त आहे. व्यसन जडल्याचे वय आता १८, १६ आणि १४ वर्षावरुन ९ ते १२ वर्षापर्यंत आले आहे. मात्र या व्यसनात ग्रामीण भागात महिलांनाही खर्रा खाण्याचे व्यसन जडल्याने पानटपऱ्यावर महिलाही खर्रा घेतानाचे चित्र बघावयास मिळत आहे.झोपडपट्टीतील मुलेच व्यसनाच्या आहारी जातात, असे म्हटले जात असेल तर खोटे आहे. व्यसनाच्या आहारी उच्च व सुरशिक्षित वर्गातील मुलेही बळी पडत आहेत. मग हे व्यसन व्हाईटनर, सिगारेट, किंवा व्हिडीओ गेमचे असो. झोपडपट्टीतील मुलांना व्यसन जडण्यास तेथील वातावरण कारणीभूत ठरते तर उच्च शिक्षित वर्गामध्ये मुलांचा एकटेपणा त्यांना व्यसनाकडे नेत असल्याचे दिसून येत आहे. दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला त्यातून बाहेर काढता येते. परंतु अंमली पदार्थाचे व्यसन लागलेल्या व्यक्ती त्यातून बाहेर पडणे कठीण असते. लहान वयात हे व्यसन लागले तर ते सोडवण कठीण जाते.रस्त्यावर भटकणाऱ्या मुलांमध्ये व्हाईटनरचे व्यसन मोठ्या प्रमाणात दिसत होते. व्हाईटनर संदर्भात जनजागृती झाल्यावर ते मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे ही मुले सध्या इतर व्यसनाकडे वळली आहेत. बिडी- सिगारेटचे व्यसनही त्यांच्यामध्ये दखल घेण्याजोगे आहे. विशेषत: रेल्वे स्थानक व त्या परिसरात राहणाऱ्या मुलामध्ये अफूचे व्यसन मोठ्या प्रमाणात दिसते तर दुसरीकडे आई-वडील दोघेही नोकरीला असलेल्यांच्या मुलामध्ये सिगारेट, घुटका आदीचे व्यसन दिसते.व्यसन हे फक्त अंमली पदार्थाचेच नसते, तर ते इतर गोष्टीचेही असू शकते. याचेच एक उदाहरण म्हणजे मोबाईल गेम आणि व्हीडीओगेम हे आहे. सध्याची पिढी अॅडव्हान्स असल्याने नवीन तंत्रज्ञान झटपट आत्मसात करीत असते, याला लहान मुलेही अपवाद नाहीत. मोबाईल तसेच टीव्ही वर मुले तासनतास व्हिडीओ गेम खेळताना दिसतात. सुरुवातीला मुले एका जागी बसावित म्हणून पालक त्यांच्या हातात ही साधने पुरवतात. मात्र नंतर मुलांना त्याचे व्यसनच जडते.एकाच जागी तासनतास ही मुले गेम खेळत असतात. याचा त्यांच्या शारिरीक व मानसिक वाढीवर मोठा परिणाम होतो. अग्रोबड सारख्या गेम किंवा टीव्हीवरील कार्टुनही मुलांना अधिकाधिक आक्रमक बनवत आहेत. एखाद्या दिवसी मुलांना यापासून रोखण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्या भावनाचा हिरमोड होतो. याकडे पालकांनी अतिशय गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.(वार्ताहर)रेल्वे फलाटावरील मुलांची समस्याही न्यारीशहरातील रेल्वे स्थानकावर परराज्यातून तसेच राज्यातून घरातून पळून आलेल्या मुलाची संख्या मोठी आहे. घरगुती कारण तसेच शहराचे आकर्षण म्हणून ही मुले पळून आलेली असतात. उदरनिर्वाहासाठी भीक मागणे, तसेच दिवसभर फलाटावर भटकणे असा त्यांचा दिनक्रम असतो. हीच मुले इतर व्यसनी मुलांच्या संगतीत व्यसनाच्या आहारी भटकत जातात. त्या मुलांना गांजा चरसचे व्यसन जडल्याचे दिसून येत आहे. यासाठी त्यांची परिस्थिती, वातावरण कारणीभूत असल्याचे अनेकाकडून सांगण्यात येते. मात्र याच्या मुक्तीसाठी काही स्वयंमसेवी संघटनांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे.ग्रामीण भागात महिलाही खर्ऱ्याच्या आहारीग्रामीण भागात मजुरी करणाऱ्या महिलांमध्ये पानटपऱ्यावरील तंबाखू तथा खर्रा खाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. कामावर जाण्याच्या वेळी या महिला पानटपरीवर येताना दिसतात. त्यामुळे या व्यसनामध्ये महिलाही मागे नाहीत, असेच म्हणण्याची पाळी आली आहे.
अल्पवयीन मुले व्यसनाच्या विळख्यात
By admin | Updated: February 8, 2016 00:59 IST