शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

जिल्ह्यात 47 हजार 656 नवीन मतदारांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2021 05:00 IST

भारत निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान मतदारांनी नावनोंदणी केली.       यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते. गावागावात जनजागृती करून नवीन मतदारांची नावनोंदणी करून घेतली.

साईनाथ कुचनकारलोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : काही दिवसांपूर्वी नवीन मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. यामध्ये  जिल्ह्यात तब्बल ४७ हजार ६५६ मतदारांनी नावनोंदणी केली आहे. यामध्ये सर्वाधिक १५ हजार ९४३  मतदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात तर सर्वात कमी नोंदणी चिमूर विधानसभा क्षेत्रात झाली आहे. यामध्ये ११ हजार ३६५ मतदारांचे नाव वगळण्यात आले आहे.भारत निवडणूक आयोग व राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी १ जानेवारी २०२२ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम हाती घेतला होता. त्यानुसार १ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान मतदारांनी नावनोंदणी केली.       यासाठी जिल्हा प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचारी कामाला लागले होते. गावागावात जनजागृती करून नवीन मतदारांची नावनोंदणी करून घेतली.जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहे. या सर्वच क्षेत्रांत ऑनलाइन तसेच ऑफलाइन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली होती. १ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे पूर्ण होत असलेल्या एकूण ४७ हजार ६५६ नवमतदारांनी नावनोंदणी केली आहे, तर ११ हजार ३६५ मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आले आहे. या मतदार नोंदणी कार्यक्रमांतर्गत मृत मतदार आणि कायम स्थलांतरित मतदारांच्या नावांची, लग्ने होऊन बाहेर गेलेल्या महिलांची वगळणी तसेच लग्न होऊन गावात आलेल्या महिलांच्या नावांची नोंदणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सहा नगरपंचायतीची निवडणूक आहे. मात्र १८ वर्ष पूर्ण न झालेल्यांना वंचित रहावे लागणार आहे.

ऑनलाईनचा आधार- मतदार नोंदणी अभियान सुरू असताना जिल्ह्यात ९ हजार २२९ जणांनी ऑनलाइन मतदार नोंदणी अर्ज भरला आहे. - यामध्ये सर्वाधिक ३ हजार ४९१ चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील तरुणांनी ऑनलाइनचा आधार घेतला आहे. - राजुरा क्षेत्रातील ६९०, बल्लारपूर ३०३१, ब्रह्मपुरी ४१२, चिमूर ५६०, वरोरा १ हजार ४५ जणांनी ऑनलाइन अर्ज भरला आहे

 

टॅग्स :Electionनिवडणूक