शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

नव्या १८५ बाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2020 5:00 AM

शुक्रवारी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१३ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ बाधिताचा समावेश आहे.

ठळक मुद्देजिह्यात तीन हजार ३७ ॲक्टीव्ह रुग्ण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्ह्यात शुक्रवारी १८५ नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या १४ हजार ३८७ वर पोहोचली आहे. तसेच शुक्रवारी १२३ बाधित कोरोनातून बरे झाल्याने आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ११ हजार १३७ झाली आहे. सध्या तीन हजार ३७ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख १३ हजार ७६५ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी ९७ हजार ८२५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.शुक्रवारी चंद्रपूर शहरातील व परिसरातील आंबेडकर नगर बाबुपेठ, बालाजी वार्ड, पठाणपुरा वार्ड, बाजार वार्ड, ओमकार नगर, हॉस्पिटल वार्ड, गोपाल पुरी, वडगाव, लक्ष्मी नगर, इंदिरानगर, कृष्णा नगर, गणेश नगर, स्वावलंबी नगर, सौगात नगर, भिवापुर वॉर्ड, रयतवारी कोलरी परिसर, सिद्धार्थ नगर, विकास नगर, ऊर्जानगर, गुरु नगर, अष्टभुजा वार्ड, लुंबिनी नगर, महेश नगर, संगीत नगर, भाना पेठ वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे.यासोबतच बल्लारपूर तालुक्यातील साईबाबा वार्ड, गौरक्षण वार्ड, बिल्ट कॉलनी परिसर, विसापूर, विद्यानगर वार्ड, सुभाष वार्ड भागातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील आनंदवन परिसर, बावणे लेआउट, माजरी खदान परिसर, अभ्यंकर वार्ड, करंजी, शांतीवन परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील सुंदर नगर, नवेगाव पांडव, विद्यानगर, भगतसिंग वार्ड, सुलेझरी, रमाबाई चौक, शांतीनगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील स्नेहल नगर, गुरु नगर, सुरक्षा नगर, शिवाजीनगर परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील चुनाभट्टी वार्ड, विहिरगाव,भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील क्रांतीनगर,डोमा भागातून बाधित ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील तातेवार सभागृह परिसर, नवरगाव, अंतरगाव परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. नागभीड तालुक्यातील बाळापूर, सावरगाव, कन्हाळगाव, तळोधी, सुलेझरी, नवेगाव पांडव भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर, काटलबोडी भागातून बाधित ठरले आहे.आणखी दोघांचा मृत्यूशुक्रवारी जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहरातील सुमित्रा नगर येथील ४० वर्षीय पुरुष व बल्लारपूर शहरातील झाकीर हुसेन वार्ड येथील ७३ वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत २१३ बाधितांचा मृत्यू झाला असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २०२ बाधिताचा समावेश आहे.तालुकानिहाय बाधितांची संख्याजिल्ह्यात शुक्रवारी पुढे आलेल्या बाधितांमध्ये ११३ पुरूष व ७२ महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील ७५ बाधित, बल्लारपूर तालुक्यातील आठ, चिमूर तालुक्यातील तीन, मूल तालुक्यातील चार, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील १५, ब्रह्मपुरी तालुक्यातील १२, नागभीड तालुक्यातील १८, वरोरा तालुक्यातील १५, भद्रावती तालुक्यातील सहा, सावली तालुक्यातील पाच, सिंदेवाही तालुक्यातील १३, राजुरा तालुक्यातील ३, गडचिरोली येथील पाच तर यवतमाळ व राजस्थान येथील प्रत्येकी एक असे एकूण १८५ बाधित पुढे आले आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या