शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ब गटाच्या जमिनी अ गटात समाविष्ट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:49 IST

चंद्रपूर जिल्ह्यातील मालकी हक्काच्या जमिनी ‘ब’ गटात समाविष्ट असल्याने जमीन मालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

ठळक मुद्देकिशोर जोरगेवार : भूमी अभिलेख कार्यालयासमोर शिवसेनेचे धरणे

आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मालकी हक्काच्या जमिनी ‘ब’ गटात समाविष्ट असल्याने जमीन मालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. एखादे बांधकाम करण्याचीसुद्धा परवानगी दिली जात नाही. त्यामुळे जमिनी आमच्या असूनही त्यावर आमचा अधिकार नाही. मालकी हक्काच्या जमिनी ‘अ’ गटात समाविष्ट न केल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख किशोर जोरगेवार यांनी दिला.चंद्रपूर जिल्ह्यातील मालकी हक्काच्या ‘ब’ गटातील जमिनी ‘अ’ गटात समाविष्ट करण्यात याव्या, या मागणीसाठी सोमवारी भूमिअभिलेख उपअधीक्षक यांच्या कार्यालयासमोर शिवसेनेच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.लोकांच्या सर्व जमिनी ‘अ’ गटात समाविष्ट करण्यात याव्या, त्याचप्रमाणे जनतेच्या थकीत असलेल्या फेरफारची प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात यावी, केवळ एका प्लाटच्या मोजणीसाठी संपूर्ण जमिनीचे पैसे भरावे लागते. ती अट रद्द करण्यात यावी, या मागण्याही यावेळी लावून धरण्यात आल्या.स्वत:च्या ज्या जमिनी मालकी हक्काच्या आहेत. तसेच ज्या जमिनीच्या हस्तांतरणावर कोणतेही निर्बंध नाहीत व नझूल खसºयात अहस्तांतरणीय नमूद नाही, ज्यांची ७५ टक्के अनिर्जित रक्कम भरली आहे, त्यांना १२.५ टक्के अनिर्जित रक्कम शासनाकडून देण्यात यावी, अशीही मागणी आहे. हस्तांतरणावर कोणतेही निर्बंध खसºयात नमूद नसताना मिळकत पत्रिकेत ‘ब’ दाखविले असल्याने चंद्रपूर येथील जनतेला याचा नाहक त्रास होत आहे.मागण्या पूर्ण न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. या धरणे आंदोलनात नगरसेवक विशाल निंबाळकर, माया पटले, सायली येरणे, मुन्ना लोढे, इरफान शेख, कलाकार मल्लरप, विलास वनकर, किशोर बोबडे, दीपक पद्मगिरवार, कैलास धायगुडे, राहुल मोहुर्ले, सुधीर माजरे, विनोद गरडवा, विनोद गोल्लजवार, शांता धांडे, राजेंद्र पुल्लीपाका, राशीद हुसैन, अशफाक राजाखान, सिकंदर दुर्गे, आनंद रणशूर, मुन्ना जोगी, रामेश्वर हिकारे, लक्ष्मण बोबडे, सुमेश रंगारी, स्वप्नील वाढई, दिलीप बेंडले, गौरव जोरगेवार, विलास सोमलवार, माला तुरारे, लक्ष्मण टोकला, टिकाराम गावंडे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.