शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

जंगलालगतच्या शेतात वणवा लावल्यास होईल कारवाई; वनविभागाने शेतकऱ्यांना बजावल्या नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 13:51 IST

यंदा वनविभाग कडक : २ वर्षे कारावासाची शिक्षाही जंगलात वणवा लावणाऱ्याला ठोठावली जाऊ शकते.

प्रवीण खिरटकर लोकमत न्यूज नेटवर्कवरोरा : शेतात उन्हाळ्यामध्ये पिके नसतात. शेतीची मशागत करताना शेतकरी शेतात वणवा लावतात. हा वणवा कधीकधी जंगलात जात असतो. त्यामुळे जंगलातील झाडे व वन्यप्राण्यांना त्याची मोठ्या प्रमाणात झळ पोहोचते. सध्या राज्यातील वनविभाग अॅक्शन मोडवर आला असून, जंगलालगतच्या शेतामध्ये वणवा लावण्याआधी वनविभागास कळवावे, अन्यथा वनविभाग कायदेशीर कारवाई शेतकऱ्यावर करणार आहे. याबाबतच्या नोटीस वनविभागाने शेतकऱ्यांना दिल्या आहेत.

उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. पानझळ सुरू झाली असल्याने झाडाची पाने पूर्णतः सुकलेली आहेत. जंगलात मोहफूल वेचताना तसेच तेंदूपत्ता गोळा करताना आग लावण्याचे प्रकार आढळून येतात. तसेच शेतकरी शेतातील गवत पुढील हंगामात येऊ नये, याकरिता शेतातील धुन्ऱ्यावर वणवा लावतात. वणवा लावल्यानंतर ती आग पूर्णपणे विझली की नाही, याची शहानिशा कुणीच करताना दिसत नाही. आग विझली नाही तर ती हवेने जंगलात पसरते. अशा प्रकारे जंगलाला आग लागल्याच्या अनेक घटना उन्हाळ्यामध्ये घडत असतात. एकदा जंगलाला आगेची झळ बसल्यास नवीन रोपे तयार होत नाही. वनस्पती नष्ट होतात. वन्यप्राणी आगीमुळे आपला मूळचा अधिवास सोडून इतरत्र भटकंती करतात. 

अशी आहे शिक्षेची तरतूदवनविभागात वणवा लावताना पूर्वसूचना दिली नाही, हा वणवा जंगलात पोहोचलास त्या शेतकऱ्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ व भारतीय वन अधिनियम १९२७ यानुसार कडक कारवाई करण्यात येणार आहे. नुकसानीची किंमत आणि पाच हजार रुपये दंड व दोन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली जाते. 

जाळरेषा ठरते महत्त्वाचीजाळ रेषेमुळे वणवा जंगलात पसरू शकत नाही. वनातील विविध प्रजातीच्या वनस्पतीचे संरक्षण होण्यास यामुळे मोठी मदत होते. त्यामुळे वनविभागातर्फे उन्हाळ्यात दरवर्षी अशा प्रकारे जाळ रेषा काढली जाते. तीन मीटर, सहा मीटर, नऊ मीटर, बारा मीटर आधी प्रकारानुसार जाळ रेषा काढली जाते. ती महत्त्वाची असते. 

"जंगलालगतच्या शेतकऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे शेतात वणवा लावण्यापूर्वी वनविभागास कळवावे. त्यामुळे वनविभाग सहकार्य करेल."- सतीश शेंडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वरोरा

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर