शहरं
Join us  
Trending Stories
1
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
2
निवडणुका महायुती की स्वबळावर; निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना, मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्टीकरण
3
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
4
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
5
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला
6
जोपर्यंत न्याय नाही, तोपर्यंत अंत्यसंस्कार होणार नाही, IPS पुरन कुमार यांच्या पत्नीची आक्रमक भूमिका
7
ENG W vs SL W : ...अन् श्रीलंकन कॅप्टनवर आली स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर जाण्याची वेळ; जाणून घ्या सविस्तर
8
माझ्या राजकीय कारकिर्दीत मी पाहिलेले पहिले हतबल मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे; बावनकुळेंची टीका
9
शेवटच्या चेंडूपर्यंत थरार, नामिबियाने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेला हरवलं, सामन्यात नेमकं काय घडलं?
10
वयाने लहान तरुणाला घरी बोलावून ठेवायची शारीरिक संबंध, मग केली हत्या, महिलेला अटक
11
Nashik: "...शरीरसंबंध ठेव, अन्यथा तुझे फोटो व्हायरल करीन"; मुंबईत विवाहित मैत्रिणीचे व्हिडीओ काढले, घरी जाऊन केला बलात्कार
12
फ्रान्सच्या राजकारणात मोठी उलथापालथ, सेबॅस्टिन लेकोर्नू एका आठवड्यात दुसऱ्यांदा बनले पंतप्रधान
13
"उद्धवजी, हंबरडा राखून ठेवा, महापालिकेतील पराभवानंतर तुमच्या..."; शेलारांचे ठाकरेंना उत्तर
14
या उद्योगातील ५० हजार नोकऱ्या धोक्यात! हळूच जातील जॉब; हा आहे कंपन्यांचा प्लान
15
"राहुल गांधींची जशी अमेठीमध्ये अवस्था झाली होती, तशीच तेजस्वी यादवांची..."; प्रशांत किशोर यादवांच्या बालेकिल्ल्यातून फुंकणार रणशिंग
16
"पत्नीची हत्या, १३ वर्षांचा कारावास भोगला; बाहेर येताच त्याने..."; आरोपीचे कारनामे कळल्यावर पोलिसही अवाक्
17
सोन्यापासून बनवला सगळ्यात महागडा ड्रेस, तुम्ही बघितला का? वजन १० किलो आणि किंमत...
18
ट्रम्प यांनी चीनवर लादले 100% टॅरिफ; शेअर आणि क्रिप्टो मार्केट कोसळले, $2 ट्रिलियन बुडाले...
19
"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर
20
नोबेल परत घ्या, मुस्लिम संघटनांनी मारिया कोरिना मचाडो यांच्या विरोधात आंदोलन केले सुरू

क्षयरुग्णांची नोंद न ठेवणाऱ्या रुग्णालयावर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:40 IST

क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशांमध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस प्लॅन सन २०१७ ते २०२५ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टीकोनातून १६ मार्च २०१८ ची अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक रुग्णालयाने क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

ठळक मुद्देक्षयमुक्तीसाठी पाऊल : रुग्णांना पोषण आहारासाठी मदत

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : क्षयमुक्त भारत करण्यासाठी देशांमध्ये सर्व स्तरातून प्रयत्न करण्यात येत असून राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम नॅशनल स्टेटस प्लॅन सन २०१७ ते २०२५ कार्यक्रमांतर्गत क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्याच्या व त्यामुळे होणारे मृत्यू रोखण्याच्या दृष्टीकोनातून १६ मार्च २०१८ ची अधिसूचना लागू करण्यात आलेली आहे. याअंतर्गत प्रत्येक रुग्णालयाने क्षयरुग्णांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता (१८६० च्या ४५ च्या) कलम २६९ आणि २७० च्या अंतर्गत शिक्षा करण्यात येणार आहे.जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम २००३ पासून राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत क्षयरोग तसेच एमडीआर, एक्सडीआर रोगनिदानाच्या अद्यावत सुविधा, संपूर्ण औषधोपचाराच्या सोई सुविधा निशुल्क उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तसेच निक्षय पोषण योजनेअंतर्गत रुग्णांचा उपचार पूर्ण होईपर्यंत ५०० रुपये पोषण आहारासाठी आर्थिक मदत रुग्णांच्या खात्यात जमा केली जाते. परंतु बºयाच रुग्णांची नोंद झाली नसल्याने दर दीड मिनिटाला एक क्षयरुग्णाचा मृत्यू होतो.तसेच बहुतेक रुग्णांचा क्षयरोगाचे निदानापासून तसेच औषधोपचार यापासून वंचित राहतात. या रुग्णांची नोंदणी प्रक्रिया सोपी व्हावी, याकरिता केंद्र सरकारने निक्षय नावाच्या अ‍ॅपची निर्मिती केलेली आहे. रुग्णांची नोंद करणाºया वैद्यकीय व्यवसायिकाला ५०० रुपये मानधन, रुग्णांचा उपचार पूर्ण करून घेतल्यास पुन्हा ५०० रुपये मानधन, रुग्णांचे उपचार यशस्वीपणे पूर्ण करणाºया उपचार सहाय्यकास ड्रग सेंसेटिव्ह रुग्णांना एक हजार रुपये, एमडीआर रुग्णामागे पाच हजार रुपये, रुग्णांना आवश्यक तपासणीसाठी ५०० रुपये मानधन अशा विविध सुविधा देण्यात येत आहे. रुग्णालयांनी क्षयरुग्णांची नोंद न केल्यास संबंधित सर्व सार्वजनिक व खासगी रुग्णालयांना तसेच वैद्यकीय व्यावसायिकांना भारतीय दंड संहिता अंतर्गत शिक्षा करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.निक्षय अ‍ॅपदेशातील कोणत्याही कानाकोपºयातल्या क्षयरुग्णांची माहिती या अ‍ॅपच्या माध्यमातून मिळवता येईल. ज्या रुग्णांची नोंदणी झाली त्यांना एक युनिक आयडी देण्यात येते. याअंतर्गत प्रत्येक रुग्णांच्या उपचाराची स्थिती तसेच बँकेच्या खात्याची माहिती संग्रहित असते. याद्वारे रुग्णांना कोणत्याही क्षयरोग केंद्रात उपचार करून घेता येतो. या अ‍ॅपला रुग्णांच्या बँक खात्याला जोडलेले आहे. तसेच रुग्णांना पोषण आहारासाठी जी आर्थिक मदत दिली जाते, त्याची स्थिती पाहता येणार आहे. ती आर्थिक मदत वेळेवर न मिळाल्यास या अ‍ॅपवर तक्रार करता येते. अशा सुविधा या अ‍ॅपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे.

टॅग्स :Healthआरोग्य